महिलांच्या तिरंगी राष्ट्र टी-20 मालिका (Tri Series) 2020 चा तिसरा सामना भारत (India) आणि यजमान ऑस्ट्रेलिया (Australia) संघात आज कॅनबेरा (Canberra) येथील मानुका ओव्हल (Manuka Oval) येथे खेळला जाईल. इंग्लंडविरुद्ध झालेल्या मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने विजयी सलामी दिली आणि रविवारी ऑस्ट्रेलियाविरुद्ध सामन्यात दोन्ही सांग 2 पैकी 2 विजय मिळविण्याच्या विचारात असतील. भारतीय संघाने मालिकेच्या पहिल्या सामन्यात इंग्लंडने दिलेल्या 147 धावांचा सहजतेने पाठलाग केला. आणि आज ऑस्ट्रेलियाविरुद्ध तशाच कामगिरीची पुनरावृत्ती करण्याचा ते प्रयत्न करतील. ऑस्ट्रेलियासाठी मालिका नकारात्मक पद्धतीने सुरू झाली. सुपर ओव्हरमध्ये त्यांना इंग्लंडकडून पराभवाला सामोरे जावे लागले. आजचा सामना जिंकण्यासाठी त्यांना पसंती मिळाली असली तरीही त्यांच्या समोर कठीण आव्हान असणार आहे. सर्वोत्तम फॉर्ममध्ये असणाऱ्या भारताला पराभूत करण्यासाठी त्यांना सर्वतोपरीने प्रयत्न करावे लागणार आहे. (Women's Tri-Series 2020: स्मृती मंधाना झेलबाद झाल्याचा इंग्लंडच्या एमी जोन्स हिचा अंपायरकडे दावा, नेटीझन्सनी 'Cheater' म्हणून केली संभावना WATCH)
तिरंगी मालिकेतील तिसरा सामना भारत आणि ऑस्ट्रेलिया महिला संघासह होईल. हा सामना मनुका ओव्हल, कॅनबेरामध्ये खेळला जाईल. सामना भारतीय वेळेनुसार सकाळी 8 वाजून 40 मिनिटांनी सुरु होईल. भारतीय चाहते हा सामना Sony ESPN आणि Sony ESPN HD वर लाईव्ह पाहू शकतात.
बेथ मुनी हिच्या शानदार खेळीनंतरही इंग्लंडविरुद्ध 157 धावांचा पाठलाग करण्यात अपयशी ठरल्यामुळे कर्णधार मेग लॅनिंग आणि संघ निराश असेल. दुसरीकडे, फॉर्मात नसलेल्या कर्णधार हरमनप्रीत कौर ने मागील सामन्यात केलेली कामगिरी पाहून संघ संतुष्ट असेल. 21 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या विश्वचषक स्पर्धेच्या सलामीच्या सामन्यात दोन्ही संघ आमने-सामने येतील.
असा आहे भारत-ऑस्ट्रेलिया महिला संघ
टीम इंडिया: हर्लीन देओल, स्मृती मंधाना, जेमिमाह रोड्रिग्स, हरमनप्रीत कौर (कॅप्टन), वेदा कृष्णमूर्ती, दीप्ती शर्मा, शिखा पांडे, तान्या भाटिया (विकेटकीपर), राधा यादव, पूनम यादव, राजेश्वरी गायकवाड, नुझत पारविन, पूजा वस्त्रकर, अरुंधती रेड्डी, शाफाली वर्मा, रिचा घोष.
ऑस्ट्रेलिया: एलिसा हेली (विकेटकीपर), बेथ मूनी, एशले गार्डनर, मेग लॅनिंग (कॅप्टन), एलिस पेरी, राचेल हेन्स, जेस जोनासेन, सोफी मोलिनक्स, अॅनाबेल सदरलँड, डेलिसा किमिन्स, जॉर्जिया व्हेरहॅम, मेगन शूट, जेस जोनासेन, सोफी मोलिनक्स, निकोला केरी, एरिन बर्न्स, तैला व्लेमिंक.