Women's Tri-Series 2020: स्मृती मंधाना झेलबाद झाल्याचा इंग्लंडच्या एमी जोन्स हिचा अंपायरकडे दावा, नेटीझन्सनी 'Cheater'  म्हणून केली संभावना (WATCH)
एमी जोन्स (Photo Credit: Twitter/ICC)

यजमान ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्ध महिला तिरंगी मालिकेत इंग्लंड (Engaland) विरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात भारतीय महिला संघाने (India Women's Team) पाच विकेटने असला तरी इंग्लंडची विकेटकीपर फलंदाज एमी जोन्स (Amy Jones) ने वाद निर्माण केला होता. तिरंगी मालिकेचा पहिला टी-20 सामना कॅनबेरा (Canberra) येथे खेळवण्यात आला. या सामन्याच्या भारतीय डावाच्या दुसऱ्या ओव्हरच्या तिसऱ्या चेंडूवर सलामीची फलंदाज महिला स्मृती मंधाना (Smriti Mandhana) विवादास्पद निर्णयाच शिकार बनली. मानधवाने इंग्लंडची वेगवान गोलंदाज कॅथरिन ब्रंटच्या चेंडूवर कट मारायचा प्रयत्न केला, पण चेंडू यष्टीरक्षक जोन्सकडे गेले, जिने कॅच पकडल्याचा दावा केला. डावी बाजूला हवेत उडी मारत प्रशंसनीय झेल पकडल्यानंतर जोन्सने स्टार भारतीय फलंदाजला पॅव्हिलिअनचा मार्ग दाखवल्याचे समजले जात होते. आऊट झाल्याचा विचार करत स्म्रितीही मैदानाबाहेर जायला निघाली. (India vs England Women's Tri-Series 2020: भारतीय महिला संघाची इंग्लंडविरुद्ध तिरंगी मालिकेत विजयी सुरुवात, हरमनप्रीत कौर ची नाबाद बॅटिंग)

तथापि, रीप्लेमध्ये जोन्सने तिचा झेल सोडल्याचे समजले आणि निर्णय उलथून टाकला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे आणि चाहत्यांनी एमी जोन्सला फटकारले आणि झेलच्या चुकीच्या दाव्यासाठी तिला चीटर म्हटले. यानंतर मैदानावर स्म्रिती जास्तकाळ टिकू शकली नाही आणि ती 15 धावांवर बाद झाली. पाहा या कॅचचा हा व्हिडिओ:

प्रतिक्रिया:

चीटर एमी जोन्स

शेवटचा

आऊट नाही!

आऊट की नाही?

काय फसवणूक आहे !!!

सामन्याबद्दल बोलताना टीम इंडियाने टॉस जिंकला आणि पहिले गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. इंग्लिश संघाने सात गडी गमावून 147 धावा केल्या. हेदर नाइटने संघासाठी सर्वाधिक 67 धावा केल्या. भारताकडून हरमनप्रीत कौर हिने सर्वाधिक 34 चेंडूंत 42 धावा केल्या. टीम इंडियाचा पुढील सामना यजमान ऑस्ट्रेलियाविरुद्ध रविवारी, 2 फेब्रुवारी रोजी खेळला जाईल. त्यापूर्वी, 1 फेब्रुवारी रोजी ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड संघ मालिकेतील दुसऱ्या सामन्यात आमने-सामने येतील.