KXIP vs SRH, IPL 2020: निकोलस पूरनच्या खेळीवर SRHने फेरले पाणी, किंग्स इलेव्हनचा 69 धावांनी पराभव करत मिळवला तिसरा विजय
सनरायजर्स हैदराबाद (Photo Credit: Twitter/IPL)

KXIP vs SRH, IPL 2020: सनरायजर्स हैदराबादने (Sunrisers Hyderabad) पहिले फलंदाजी करून दिलेल्या 202 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करणाऱ्या किंग्स इलेव्हन पंजाबला (Kings XI Punjab) 16.5 ओव्हरमध्ये 132 धावांपर्यंत मजल मारता आली आणि 69 धावांनी पराभव पत्करावा लागला. हैदराबाद संघाने जॉनी बेअरस्टो (Jonny Bairstow) आणि डेविड वॉर्नरच्या (David Warner) अर्धशतकांच्या जोरावर 20 ओव्हरमध्ये 6 गडी गमावून 201 धावा केल्या. पंजाबकडून त्यांची सलामी जोडी प्रभाव पाडण्यात अपयशी ठरली. केएल राहुल 11 आणि मयंक अग्रवाल 9 धावा करून बाद झाले. मधली फळी देखील फ्लॉप ठरली. पंजाबकडून निकोलस पूरनने (Nicholas Pooran) एकाकी झुंज दिली आणि 77 धावा केल्या. पण पूरनच्या विक्रमी अर्धशतक हैदराबाद गोलंदाजांनी पाणी फेरले. पूरनला वगळता एकही फलंदाज प्रभावी कामगिरी करू शकला नाही. दुसरीकडे, हैदराबादकडून रशीद खानने 3, खालील अहमदने 2, तर अभिषेक शर्मा आणि टी नटराजन यांना प्रत्येकी 1 यश मिळाले. या विजयासह हैदराबादने आयपीएलमधील तिसरा विजय मिळवला तर पंजाबला पाचव्या पराभवाला सामोरे जावे लागले. (KXIP vs SRH: निकोलस पुरनने अवघ्या 17 चेंडूत ठोकले आयपीएल 13 मधील सर्वात जलद अर्धशतक, या स्पेशल क्लबमध्ये मिळवले स्थान)

हैदराबादविरुद्ध पंजाबची चांगली सुरुवात नाही आणि सलामी फलंडनज मयंक 9 धावांत विकेट गमावून बसला. खलील अहमदला आक्रमक फटका मारण्याच्या प्रयत्नात प्रभसिमरन माघारी परतला. या युवा फलंदाजाने 8 चेंडूत 11 धावा केल्या. पूरनकडून सलग दोन षटकार खाल्ल्यानंतर अभिषेकने हैदराबादला मोठे यश मिळवून दिले. 11 धावांवर पंजाबचा कर्णधार राहुलला केन विल्यमसनकडे त्याने झेलबाद करून परत पाठवले. यादरम्यान पूरनने यंदाच्या आयपीएलमधील सर्वात जलद अर्धशतक ठोकले, पण ते संघाला विजय मिळवून देण्यास पुरेसे नव्हते. मॅक्सवेल 7 धावा काढून बाद झाला. मॅक्सवेल 7 धावा करून बाद झाला. मनदीप सिंह रशीद खानच्या शानदार गुगलीत अडकला. यानंतर खलीलने मुजीब उर रेहमानची विकेट घेतली. 77 धावांवर फलंदाजी करणाऱ्या पूरनला बाद करत राशिदने हैदराबादला सर्वात मोठा यश मिळवून दिला. पूरनला रशीदने टी नटराजनच्या हाती कॅच आऊट केले आणि हैदराबादचा विजय निश्चित केला. यानंतर त्याच ओव्हरमध्ये रशीदने मोहम्मद शमीला एलबीडब्ल्यू आऊट केले.

यापूर्वी वॉर्नर आणि बेअरस्टोरने करून दिलेल्या चांगल्या सुरुवातीनंतर हैदराबादची बॅटिंग गडगडली, तर त्यांनी पंजाबसमोर आव्हानात्मक धावसंख्या उभारली. वॉर्नर आणि बेअरस्टोमध्ये पहिल्या विकेटसाठी 160 धावांची भागीदारी झाली. बेअरस्टो 55 चेंडूत 97 धावा करून तर वॉर्नर 40 चेंडूत 52 धावा करून माघारी परतले. पंजाबकडून रवी बिश्नोईने 3 विकेट घेतल्या, तर अर्शदीप सिंहला 2 आणि मोहम्मद शमीला 1 विकेट मिळाली.