आयसीसी (ICC) क्रिकेट विश्वचषकमध्ये आपल्या निराशाजनक खेळीमुळे भारताचा माजी कर्णधार एम एस धोनी (MS Dhoni) टीकेचा पात्र बनला आहे. धोनी भारतीय क्रिकेटमधील यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे. यंदाच्या विश्वचषकमधील न्यूझीलंड (New Zealand) विरुद्धचा सामना त्याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील अंतिम सामना मानला जात आहे. विश्वचषकमध्ये यंदा धोनीने आपल्याला साजेशी कामगिरी करता आली नाही. शिवाय, महत्वपूर्ण सामन्यात (इंग्लंड आणि न्यूझीलंड) देखील तो स्लो दजावा करत राहिला परिणामी संघाने हे दोन्ही सामने गमावले. तर सेमीफायनलमध्ये न्यूझीलंडविरुद्ध सामन्यात तो नंबर 7 वर फलंदाजी करायला आला. त्यामुळे विशेषज्ञ आणि चाहत्यांकडून त्याच्या निवृत्तीची मागणी केली जात आहे. यंदाच्या स्पर्धेत धोनी केवळ 273 धावा करू शकला. (India tour of West Indies 2019: एम एस धोनी नसणार वेस्ट इंडिज दौर्यासाठी टीम इंडियाचा भाग; नाही राहिला फर्स्ट-चॉईस विकेट किपर- सूत्र)
दरम्यान, निवड समितीचे अध्यक्ष एम एस के प्रसाद (MSK Prasad) याविषयी लवकरच त्याच्याशी बोलणार आहेत. बीसीसीआय (BCCI) च्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार धोनी आता टीम इंडियाचा पहिला पर्याय राहिलेला नाही. एकतर त्याने स्वतःहून निवृत्ती जाहीर करावी लागेल किंवा त्यांना असे करण्यास भाग पाडले जाऊ शकते. दरम्यान, धोनीच्या निवृत्तीवर त्याच्या पालकांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. स्पोर्ट्स तकच्या वृत्तानुसार, धोनीच्या बालपणचे प्रशिक्षक केशव बनर्जी (Keshav Banerjee) यांनी सांगितले की, धोनीने निवृत्ती घ्यावी आणि त्यांच्यासोबत रहावे अशी त्याच्या पालकांची इच्छा आहे. धोनी लहापणी फुटबॉलमध्ये गोलकीपिंग करायचा आणि बॅनर्जी उन्नी त्याला क्रिकेटमध्ये विकेटकीपिंग करण्यासाठी प्रोत्साहन दिले.
व्हिडिओ मुलाखतीत बोलताना केशव बनर्जी म्हणाले, "मी रविवारी धोनीच्या घरच्यांशी भेट घेतली. त्यांनी सांगितले धोनीनं आता क्रिकेट बस करावं. मी त्यांना त्वरित नकार दिला आणि सांगितले की एक वर्ष तरी धोनीनं खेळावं. त्यानं ट्वेंटी-20 वर्ल्ड कपनंतर निवृत्ती घेणं योग्य ठरेल. घरच्यांनी विरोध केला अन् म्हणाले, मग एवढ्या मोठ्या घराची काळजी कोण घेणार. मी त्यांना सांगितले इतकी वर्ष तुम्ही हे घर पाहिलेत मग आणखी एक वर्ष सांभाळ करा."