KKR vs MI, IPL 2019: कोलकाता नाइट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघाचा लाईव्ह सामना पाहा Hotstar Online वर
MI vs KKR. IPL 2019 (Photo Credits- IANS)

KKR vs MI: आज कोलकाता (Kolkata) येथील ईडन गार्डन्स स्टेडिअमवर (Eden Gardens Stadium)  कोलकाता नाइट रायडर्स (KKR) विरुद्ध मुंबई इंडियन्स (MI) संघाचा सामना खेळवला जाणार आहे. तर मुंबईचा संघ प्लेऑफमध्ये जाण्यासाठी उत्तम खेळी करेल. त्याचसोबत कोलकाताचा संघाला प्लेऑफमध्ये जाण्यासाठी मुंबई संघाकडून टक्कर देण्यात येण्याची शक्यता आहे. तर लाईव्ह सामना तुम्हाला Hotstar Online वर पाहता येणार आहे.

तीन वेळा विजय मिळवलेला मुंबईचा संघ 14 अंकांसह दुसऱ्या स्थानकावर आहे. तर शुक्रवारी रात्रीच्या सामन्यात मुंबईच्या संघाने चेन्नई सुपर किंग्सचा पराभव केला. त्यामुळे प्लेऑफमध्ये जाण्यासाठी मुंबईचा संघ जवळ आला आहे. तर आश्चर्याची गोष्ट म्हणजे मुंबईचा संघ एका आठवड्याच्या आतमध्येच कोलकाता संघासोबत दुसऱ्यांदा सामना आज खेळणार आहे. आजचा लाईव्ह सामना पाहण्यासाठी येथे क्लिक करा.

(RCB vs KXIP, IPL 2019: सामना जिंकल्यावर विराट कोहलीने सेलिब्रेशन करताच आर.अश्विन भडकला Video)

मुंबईच्या संघाने आतापर्यंत आयपीएलमध्ये दमदार कामगिरी केली आहे. तर चेन्नई विरुद्ध सामन्यात कर्णधार रोहित शर्मा याने उत्तम खेळी केली होती.