आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 46व्या सामन्यात कोलकाता नाईट राईडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Kolkata Knight Riders Vs Royal Challengers Bangalore) आज एकमेकांशी भिडणार आहेत. शारजहा मैदानात हा सामना खेळला जाणार आहे. कोलकाता नाईट राईडर्स संघाचे नेतृत्व इयॉन मॉर्गन करत आहेत. तर,किंग्ज इलेव्हन संघाचे कर्णधार पद केएल राहुल संभाळत आहे. भारतीय वेळेनुसार, आज 26 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 7 वाजता टॉस होणार असून सामना 7.30 वाजता सुरु होणार आहे. या सामन्याचे थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर पाहता येणार आहे. तसेच Disney+ Hotstar अॅपवरदेखील या सामन्याचे थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे. रिलायन्स जिओ (Reliance Jio) आणि एअरटेलने त्यांच्या ग्राहकांना काही खास ऑफर दिल्या आहेत. ज्याच्या उपयोग करून यूजर्स ऑनलाईन मॅच पाहू शकतात.
या हंगामात कोलकाता आणि पंजाब या दोन्ही संघाने प्रत्येकी 11 सामने खेळले आहेत.यापैकी कोलकाच्या संघाने 6 तर, पंजाबच्या संघाने 5 सामने जिंकले आहेत. आयपीएलच्या गुणतालिकेत कोलकाताचा संघ चौथ्या स्थानावर आहे. तर, पंजाब पाचव्या स्थानावर आहे. मुंबई इंडियन्स, दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर या तिन्ही संघानी प्ले-ऑफची जागा जवळपास निश्चित केली आहे. तर, चेन्नई सुपर किंग्जचा संघ स्पर्धेबाहेर गेला असून कोलकाता, पंजाब आणि हैदराबाद यांच्यात चौथ्या स्थानासाठी शर्यत लागली आहे. हे देखील वाचा- CSK Out of IPL 2020 Playoffs: आयपीएलच्या इतिहासातच प्रथमच महेंद्र सिंह धोनी याचा संघ चेन्नई सुपर किंग्स 'प्लेऑफ'च्या शर्यतीतून बाहेर
कोलकाता नाइट रायडर्स:
दिनेश कार्तिक (यष्टीरक्षक) शिवम मावी, संदीप वारियर, कुलदीप यादव, इयोन मॉर्गन (कर्णधार), पॅट कमिन्स, सुनील नरेन, निखिल नाईक, मणिमरण सिद्धार्थ, आंद्रे रसेल, लॉकी फर्ग्युसन, प्रशांत कृष्ण, शुभमन गिल , नितीश राणा, सिद्धेश लाड, कमलेश नगरकोटी, रिंकू सिंग, वरुण चक्रवर्ती, टॉम बंटन, ख्रिस ग्रीन, राहुल त्रिपाठी
किंग्ज इलेव्हन पंजाब:
लोकेश राहुल (कर्णधार,यष्टीरक्षक), हरप्रीत ब्रार, ईशान पोरेल, मनदीप सिंग, जेम्स नीशम, तजिंदर सिंग, ख्रिस जॉर्डन, करुण नायर, दीपक हूडा, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, ग्लेन मॅक्सवेल, मुजीब उर रहमान, सरफराज खान, शेल्डन कोटरेल, मयंक अग्रवाल, मोहम्मद शमी, दर्शन नलकंडे, निकोलस पूरन, ख्रिस गेल, मुरुगन अश्विन, जगदेवेश सुचित, कृष्णाप्पा गौथम, हार्दस विल्जोइन, सिमरन सिंह