INd vs PAK (Photo Credit - Twitter)

आशिया कप 2022 (Asia Cup 2022) मध्ये टीम इंडिया आणि पाकिस्तान (IND vs PAK) पुन्हा एकदा आमनेसामने येणार आहेत. सुपर 4 च्या दुसऱ्या सामन्यात भारत आणि पाकिस्तान दुबईच्या (Dubai Cricket Stadium) मैदानावर आज म्हणजेच 4 सप्टेंबर रोजी आमनेसामने येणार आहेत. याआधी दोन्ही संघांमध्ये ग्रुप स्टेजमध्ये सामना झाला होता, जो भारताने 5 विकेट्सने जिंकला होता. अशा स्थितीत या दोन देशांमधील ही महान लढत रंजक ठरणार आहे. महान सामन्यापूर्वी भारत आणि पाकिस्तान या दोन्ही संघांना मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानचा शाहनवाज दहनी (Shahnawaz Dahani) भारताविरुद्धच्या सामन्याला मुकणार आहे, तर आवेश खान (Avesh Khan) या सामन्यात भारतासाठी उपलब्ध नसेल. दोघे जखमी झाले आहेत.

Disney+ Hotstar वर पाहू शकता लाइव्ह स्ट्रीमिंग

आशिया कप 2022 चे प्रसारण हक्क स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत आणि त्यामुळे ते IND vs PAK T20 सामन्याचे थेट प्रक्षेपण आणि ऑनलाइन लाइव्ह स्ट्रीमिंग प्रदान करेल. Disney+ Hotstar वर IND vs PAK Super 4 सामन्याचे लाइव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन पाहण्यासाठी तुमच्याकडे सबस्क्रिप्शन योजना असणे आवश्यक आहे आणि IND vs PAK विनामूल्य स्ट्रीमिंग ऑनलाइन पाहण्याचा कोणताही मार्ग नाही. खाली तुम्ही मोबाइल अॅप किंवा अधिकृत वेबसाइटवर भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप 2022 लाइव्ह स्ट्रीमिंग ऑनलाइन पाहण्यासाठी उपलब्ध Disney+ Hotstar योजना पाहू शकता. (हे देखील वाचा: India Vs Pakistan: आज पुन्हा मौका मौका, जाणून घ्या भारतासाठी आजचा भारत विरुध्द पाकिस्तान सामना जिंकण का महत्वाचा)

Plan Price Validity Device Log ins Ads Free
149 3 Months Mobile only 1 No
299 1 Month Mobile, TV or Laptop 4 Yes
499 1 Year Mobile only 1 No
899 1 Year Mobile, TV or Laptop 2 No
1499 1 Year Mobile, TV or Laptop 4 Yes

भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप 2022 सामना कधी आणि कुठ पाहणार ?

भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप 2022 सामना रविवार, 4 सप्टेंबर 2022 रोजी दुबई क्रिकेट स्टेडियम, दुबई येथे खेळवला जाणार आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप 2022 सामना कधी सुरू होईल?

भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप 2022 सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7:30 वाजता सुरू होईल. नाणेफेक संध्याकाळी 7 वाजता होणार आहे.

भारत विरुद्ध पाकिस्तान आशिया कप 2022 सामना कोणत्या टीव्ही चॅनेलवर प्रसारित केला जाईल?

भारत विरुद्ध पाकिस्तान एशिया कप 2022 सामना स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 3 आणि स्टार स्पोर्ट्स सिलेक्ट एचडी चॅनेलवर प्रसारित केला जाईल.