भारत-पाकिस्तान (Photo Credits: Getty Images)

आशिया चषक 2022 च्या सुपर4 टप्प्यात भारत पाकिस्तान  आज पुन्हा एकदा एकमेकांशी भिडणार आहे.या दोन्ही बाजूंमधील पहिला सामना 28 ऑगस्ट रोजी दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर झाला ज्यामध्ये भारताने त्यांच्या कट्टर प्रतिस्पर्ध्यांचा अंतिम षटकांच्या थ्रिलरमध्ये 5 गडी राखून पराभव केला. त्यानंतर साखळी टप्प्यातील दुसऱ्या सामन्यात भारताने हाँगकाँगचा पराभव करून अ गटातून सुपर 4 टप्प्यासाठी पात्र ठरणारा पहिला संघ बनला. दुसरीकडे पाकिस्तानने त्यांच्या दुसऱ्या सामन्यात हाँगकाँगचा 155 धावांनी पराभव करून सुपर 4 साठी पात्र ठरले. आता सुपर 4 टप्प्यातील दोन संघ म्हणजे भारत आणि पाकिस्तान आज एकमेकांविरुध्द भिडणार आहे.  आजच्या सामना कोण जिंकणार याकडे फक्त भारत पाकिस्तानचं नाही तर संपूर्ण जगाचं लक्ष लागलं आहे.

 

भारत पाकिस्तान सामन्यात कायमचं कमालीची चुरस बघायला मिळते. आज होणाऱ्या भारत पाकिस्तान सामन्याबाबत कालच पाकिस्तानी क्रिकेटर मोहम्मद रिजवान म्हणाला भारता विरुध्दचा सामना कायम दबावपूर्ण सामना असतो. फक्त भारत आणि पाकिस्तान या दोन देशातचं नाही आशिया देशांच्या बाहेरील देशांना देखील या मॅचबाबत अधिक उत्सुकता असते म्हणून भारत विरुध्द पाकिस्तानची प्रत्येक मॅच ही फायनल मॅच असते, अशी प्रतिक्रीया मोहम्मद रिजवानने दिली आहे. (हे ही वाचा:- IND vs PAK, Asia Cup 2022: पाकिस्तानविरुद्धच्या या 'स्पेशल सेंच्युरी'वर विराट कोहलीची असेल नजर, जाणून घ्या)

 

भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जाडेजा दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे. त्यामुळे जाडेजाच्या जागी अक्षर पटेलला संधी द्यायची की रिषभ पंतच्या रुपाने अतिरिक्त फलंदाज खेळवायचा याचा फैसला संघ व्यवस्थापनाला करायचा आहे. तरी आजच्या टीम इंडियाच्या संघात कोणकोणते खेळाडू खेळतील आणि आज भारत पाकिस्तान विरुध्दचा सामना जिंकणार का याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.