IND vs AUS 1st Test 2024: पर्थ कसोटीत टीम इंडियाचे कर्णधारपद भूषवणारा भारतीय वेगवान गोलंदाज कर्णधार जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) ऑस्ट्रेलियाच्या भूमीवर एक नवा विक्रम रचला आहे. पर्थ कसोटी सामन्यात दुसऱ्या दिवशी बुमराहने ॲलेक्स कॅरीची शिकार करून दिग्गज गोलंदाजांना मागे सोडले. पर्थ कसोटीच्या पहिल्या दिवशी भारतीय संघ पहिल्या डावात 150 धावांत गारद झाला होता. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाने पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत 7 गडी गमावून 67 धावा केल्या होत्या. पहिल्याच दिवशी बुमराहने 4 विकेट घेत ऑस्ट्रेलियन कॅम्पमध्ये खळबळ उडवून दिली. आता दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होताच जसप्रीत बुमराहने इतिहास रचला आहे.
ऑस्ट्रेलियाच्या मैदानावर बुमराहचा कहर
बुमराहने पर्थ कसोटी सामन्यात 5 विकेट घेत खळबळ उडवून दिली आहे. कसोटी क्रिकेटमधील त्याची ही 11वी 5 विकेट आहे. एवढेच नाही तर ऑस्ट्रेलियाच्या घरच्या मैदानावर दुसऱ्यांदा कसोटी सामन्याच्या एका डावात अर्धा संघ बाद करण्याचा मोठा पराक्रम त्याने केला आहे. याआधी बुमराहने डिसेंबर 2018 मध्ये मेलबर्न कसोटी सामन्याच्या एका डावात 6 विकेट घेण्याचा पराक्रम केला होता.
11th five-wicket haul in Tests for Jasprit Bumrah 🔥#WTC25 | #AUSvIND ➡️ https://t.co/yq6im3evpT pic.twitter.com/FQ0CAC9EF0
— ICC (@ICC) November 23, 2024
बुमराहने कपिल देवच्या महान विक्रमाची केली बरोबरी
ऑस्ट्रेलियाविरुद्ध 5 विकेट्स घेतल्यामुळे बुमराहने आता कपिल देवच्या महान विक्रमाची बरोबरी केली आहे. सेना (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया) देशांमध्ये सर्वाधिक 5 बळी घेण्याच्या बाबतीत बुमराह आता कपिल देवच्या बरोबरीने पोहोचला आहे. दोन्ही गोलंदाजांनी सेना देशांमध्ये 7-7 वेळा 5 बळी घेतले आहेत. (हे देखील वाचा: Rishabh Pant Milestone: WTC च्या इतिहासात ऋषभ पंतचा मोठा पराक्रम, अशी कामगिरी करणारा ठरला नंबर-1 विकेटकीपर)
SENA देशांमध्ये सर्वाधिक 5 विकेट घेणारा भारतीय गोलंदाज
7 वेळा - जसप्रीत बुमराह (51 डाव)*
7 वेळा - कपिल देव (62 डाव)
इशांत आणि झहीर खानच्या विक्रमावर असेल लक्ष
बुमराहने कसोटीत सर्वाधिक 5 बळी घेण्याच्या बाबतीत इशांत शर्मा आणि झहीर खान यांची बरोबरी केली आहे. या तिन्ही गोलंदाजांनी प्रत्येकी 11 वेळा कसोटी सामन्याच्या एका डावात 5 बळी घेण्याचा पराक्रम केला आहे. आता बुमराह दुसऱ्या डावातही 5 बळी घेण्याचे लक्ष्य ठेवणार आहे. असे केल्याने तो इशांत आणि झहीर खानला मागे सोडेल.