IND vs AUS 1st Test 2024: भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात पाच सामन्याची बाॅर्डर-गावस्कर टाॅफीचा पहिला सामना पर्थ मध्ये खेळवला जात आहे. पहिल्या डावात भारतीय संघ 150 डावात आटोपला. त्यानंतर ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरुवात झाली. पहिल्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत कांगारुने 67 धावांवर 7 विकट गमावल्या. भारत अजुन 83 धावांनी आघाडीवर आहे. केएल राहुल आणि नितीश रेड्डीसह यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत (Rishabh Pant) यांनी भारताला 150 धावांपर्यंत नेण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. पंतने नितीश रेड्डीसोबत 7व्या विकेटसाठी 48 धावांची भागीदारी केली. यादरम्यान पंतने 78 चेंडूंचा सामना करत 3 चौकार आणि 1 गगनचुंबी षटकाराच्या मदतीने 37 धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली. या खेळीच्या जोरावर पंतने जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या इतिहासात मोठी कामगिरी केली आहे.
ऋषभ पंतची मोठी कामगिरी
WTC च्या इतिहासात यष्टीरक्षक म्हणून 2000 धावांचा आकडा पार करणारा तो जगातील पहिला यष्टीरक्षक ठरला आहे. होय, पंतच्या नावावर आता WTS मध्ये 30 सामन्यांच्या 52 डावांमध्ये 2034 धावा आहेत. या कालावधीत पंतची सरासरी 42.37 आणि सर्वोच्च धावसंख्या 146 आहे. (हे देखील वाचा: Jasprit Bumrah Milestone: पर्थ कसोटीत जसप्रीत बुमराहची कमाल, अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा खेळाडू)
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2034 मध्ये यष्टीरक्षक म्हणून सर्वाधिक धावा -
20234 - ऋषभ पंत (52 डाव)
1880 - मोहम्मद रिझवान (52 डाव)
1395 – लिटन दास (38 डाव)
1356 - ॲलेक्स केरी (48 डाव)
1129 – जोशुआ दा सिल्वा (52 डाव)
1100 – टॉम ब्लंडेल (43 डाव)
1067 – निरोशन डिकवेला (36 डाव)
दुसऱ्या डावात पंतकडून विशेष खेळीची आशा
पहिल्या डावात 37 धावांचे महत्त्वपूर्ण योगदान दिल्यानंतर दुसऱ्या डावातही ऋषभ पंतकडून विशेष खेळीची आशा असेल. जर भारताने ऑस्ट्रेलियाला 100 धावांच्या आत पकडले आणि दुसऱ्या डावात 200 धावा केल्या तर पर्थच्या या उसळत्या खेळपट्टीवर कांगारूंना 250 धावांचा पाठलाग करणे कठीण होईल.