IPL Teams Brand Value Report: इंडियन प्रीमियर लीगचे (Indian Premier League) ब्रँड व्हॅल्यू सहा वर्षांत पहिल्यांदा एका वर्षाच्या तुलनेत 3.6 टक्क्यांनी घसरले. 2019 मधील, 47,500 कोटी रुपयांवरून ते 2020 मध्ये घसरून 45,800 कोटी रुपयांवर गेले आहे. 2014 नंतरची ही पहिली घट आहे, बुधवारी एका अहवालात म्हटले आहे. आणि अमेरिकन डॉलरच्या बाबतीत, 2019 मध्ये आयपीएलच्या (IPL) इकोसिस्टमचे मूल्यांकन $6,780 लाख होते तर 2020 मध्ये ते 8.7 टक्क्यांनी घसरून $6,190 लाख झाले, ब्रँड व्हॅल्युएशनमध्ये तज्ञ असलेल्या क्रोल बिझनेस डफ फेल्प्सने आपल्या अहवालात म्हटले आहे. कोविडमुळे भारत सरकारने क्रीडा स्पर्धांना स्थगित केल्यामुळे मागील वर्षी आयपीएलला यूएईमध्ये स्थानांतरित करण्यात आले होते. पण भारतीय क्रिकेट बोर्डा आयपीएल आयोजित करण्यास उत्सुक होता आणि म्हणूनच 2009 ध्ये दक्षिण आफ्रिकेत खेळल्या गेलेल्या या स्पर्धेप्रमाणेच मागील वर्षी स्पर्धा देशाबाहेर हलवण्यात आली. लक्षात घेण्यासारखे म्हणजे, मागील फ्रँचायझींनीही गेल्या वर्षभरात त्यांच्या ब्रँड व्हॅल्यूजमध्ये घट नोंदविली आहे. (Mumbai Indians IPL 2021 Full Schedule: मुंबई इंडियन्स पहिल्याच सामन्यात ‘विराटसेने’शी करणार दोन हात, जाणून घ्या रोहित शर्माच्या ‘पलटण’चे संपूर्ण वेळापत्रक)
मुंबई इंडियन्सने मागील वर्षी रेकॉर्ड पाचवे आयपीएल जेतेपद जिंकले आणि लीगची सर्वात मौल्यवान टीम असून ब्रँड व्हॅल्यूच्या बाबतीत त्यांनी अव्वल स्थान पटकावले आहे. अहवालात म्हटले आहे की, चॅम्पियन्स मुंबई इंडियन्स 76 कोटी रुपयांच्या ब्रँड व्हॅल्यूसह सर्वात मौल्यवान फ्रँचायझी ठरली आहे. मात्र, 2019 मधील 80 कोटी रुपयांच्या तुलनेत हे प्रमाण 9.9 टक्क्यांनी घसरले आहे. विशेष म्हणजे, ब्रँड व्हॅल्यूमध्ये तीन वेळा विजेता चेन्नई सुपर किंग्जला सर्वाधिक घसरण सहन करावी लागली आहे. अहवालानुसार, सीएसकेचे ब्रँड व्हॅल्यू 16.5 टक्क्यांनी घसरले असून ती आता 732 कोटींच्या तुलनेत या संघाचे मूल्य 611 कोटी झाले आहे. इतकंच नाही तर कोलकाता नाईट रायडर्स टीमचे ब्रँड व्हॅल्यू 13.75% पर्यंत खाली आले आहे आणि आता त्याचे मूल्य 629 कोटी वरुन 543 कोटींवर आले आहे. याखेरीज किंग्ज पंजाबच्या ब्रँड व्हॅल्यूमध्येही 11 टक्क्यांनी घट झाली आहे.
गेल्या वर्षी कोविड-19 महामारीमुळे स्टेडियममध्ये प्रेक्षकांची उपस्थिती नव्हती, ज्यामुळे फ्रँचायझींचे बरेच नुकसान झाले, तर आयपीएलच्या ब्रँड व्हॅल्यूमध्येही घट दिसून आली आणि ती 3.6 इतकी होती. तथापि, स्टेडियममध्ये प्रेक्षकांची अनुपस्थिती असली तरी टेलिव्हिजनवर लीग पाहणार्या प्रेक्षकांच्या संख्येत प्रचंड वाढ झाली आणि आयपीएल प्रसारणकर्त्यांसाठी मोठा फायदा झाला आहे.