IPL 2021 Mumbai Indians Schedule: इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 चे वेळापत्रक रविवारी जाहीर करण्यात आले. गतविजेते मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) 9 एप्रिल रोजी चेन्नई (Chennai) येथे हंगामाच्या सुरुवातीच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरशी (Bangalore) दोन हात करेल. आठ संघांची ही स्पर्धा मुंबई, दिल्ली, बेंगलोर, चेन्नई, कोलकाता आणि अहमदाबाद अशा सहा शहरांमध्ये खेळली जाईल. आयपीएलच्या (IPL) 14व्या आवृत्तीचा अंतिम सामना 30 मे रोजी अहमदाबादच्या जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जाईल. इंग्लंडविरुद्ध भारताच्या कसोटी मालिकेदरम्यान चाहते स्टेडियमवर परतले असले तरी आयपीएलचा प्रारंभिक टप्पा प्रेक्षकांविना खेळला जाईल आणि स्पर्धेसाठी चाहत्यांना स्टेडियमवर परवानगी देण्याचा अंतिम निर्णय नंतरच्या टप्प्यावर घेतला जाईल. (IPL 2021 मध्ये होणार प्रेक्षकांची ‘एंट्री’? BCCI अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दिला मोठा अपडेट)
पहा मुंबई इंडियन्सचे इंडियन प्रीमियर लीगचे संपूर्ण वेळापत्रक
9 एप्रिल- मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगलोर, चेन्नई, संध्याकाळी 7.30
13 एप्रिल- मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, चेन्नई, संध्याकाळी 7.30
17 एप्रिल- मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद, चेन्नई, संध्याकाळी 7.30
20 एप्रिल- मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, चेन्नई, संध्याकाळी 7.30
23 एप्रिल- मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज, चेन्नई, संध्याकाळी 7.30
29 एप्रिल- मुंबई इंडियन्स विरुद्ध राजस्थान रॉयल्स, दिल्ली, दुपारी 3.30
10 मे- मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स, बंगलोर, संध्याकाळी 7.30
13 मे- मुंबई इंडियन्स विरुद्ध पंजाब किंग्ज, बंगलोर, दुपारी 3.30
16 मे- मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपर किंग्ज, बंगलोर, दुपारी 3.30
20 मे- मुंबई इंडियन्स विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर, कोलकाता, संध्याकाळी 3.30
23 मे- मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स, कोलकाता, दुपारी 3.30
यंदाच्या आयपीएलमध्ये 11 डबल हेडर असणार आहेत. दुपारचा सामना दुपारी 3:30 वाजता सुरू होईल आणि संध्याकाळचे सर्व सामने 7:30 वाजता सुरु होणार आहेत. तसेच, सर्व प्ले-ऑफ आणि अंतिम सामने अहमदाबादमध्ये खेळले जातील. कोविड-19 मुळे आयपीएलचे सामने आठही ठिकाणी होऊ शकत नाहीत आणि खेळ कायम ठेवण्यासाठी समितीने सर्व संघ तटस्थ ठिकाणी खेळण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे MI मुंबईत कोणतेही सामने खेळणार नाही. रोहित शर्माच्या नेतृत्वातील संघाने लीगच्या इतिहासात अतुलनीय यश मिळवले असून विक्रमी पाच वेळा स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. मुंबई चेन्नईत पाच, नवी दिल्लीत चार, बेंगलोरमध्ये तीन आणि कोलकाता येथे दोन सामने खेळतील.