IPL 2021: इंग्लंडविरुद्ध नुकत्याच कसोटी मालिकेसाठी मर्यादित चाहत्यांना स्टेडियमवर प्रवेश देण्याच्या तुलनेत इंडियन प्रीमियर लीगमध्ये (Indian Premier League) प्रेक्षकांना परवानगी देणे हा एका मोठा लॉजिस्टिकिकल मुद्दा ठरला असता असे माजी भारतीय कर्णधार आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे विद्यमान अध्यक्ष (BCCI) सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी सूचित केले आहे. आयपीएलच्या 14व्या हंगामासाठी मुंबई, कोलकाता, दिल्ली, चेन्नई, बेंगलोर आणि अहमदाबाद अशा ठिकाणी कोणतीही गर्दी होऊ देणार नाहीत असे बीसीसीआयने जाहीर केले आहे. “आम्ही याचे चांगले नियोजन केले आहे आणि आम्ही हे क्लस्टर्समध्ये करत आहोत. प्रत्येक संघासाठी तीन चार्टर्ड उड्डाणे (जास्तीत जास्त) असतील. आशा आहे आम्ही सर्व व्यवस्थापित करू. इंग्लंड दौर्यादरम्यान संघाकडे दोनच घरगुती चार्टर्ड उड्डाणे आहेत (चेन्नई ते अहमदाबाद आणि त्यानंतर अहमदाबाद ते पुणे),” गांगुलीने इंडिया टुडे चॅनेलला सांगितले. आयपीएल (IPL) 2021 ची सुरुवात 9 एप्रिलपासून होणार असून फायनल सामना 30 मे रोजी खेळला जाईल. भारताची प्रीमियर टी-20 लीग यंदा देशातील सहा शहरांमध्ये पार पडेल. (IPL 2021 Schedule: आयपीएल रणसंग्राम एप्रिलपासून रंगणार, BCCI कडून सामन्यांच्या तारखा जाहीर)
रविवारी इंडियन प्रीमियर लीग 2021 वेळापत्रक जाहीर करताना बीसीसीआय सचिव जय शाह यांनी सांगितले की, ‘सुरुवात करण्यासाठी’ आयपीएल 2021 चा लीग फेज बंद दारा मागे खेळला जाईल आणि प्रेक्षकांविषयी अंतिम निर्णय स्पर्धेच्या ‘नंतरच्या टप्प्यावर’ घेतला जाईल. इंग्लंडविरुद्ध नुकत्याच पार पडलेल्या कसोटी मालिकेसाठी प्रेक्षकांना परवानगी दिल्यानंतर बीसीसीआय आयपीएल 2021 साठी सावध पवित्रा घेत आहे. प्रशासकीय मंडळाने चेन्नई आणि अहमदाबाद येथे चार सामन्यांच्या मालिकेच्या अंतिम तीन सामन्यांसाठी क्षमतेच्या 50 टक्के प्रेक्षकांना परवानगी दिली होती. मागील आवृत्ती संयुक्त अरब अमिरातीमध्ये (यूएई) पार पडल्यानंतर आयपीएल 2021 संपूर्णपणे भारतात आयोजित केले जाणार आहे.
तथापि, मागील आवृत्तीच्या विपरीत, स्पर्धा फक्त सहा ठिकाणी खेळली जाईल, सहभागी संघ देशभरात फक्त तीन वेळा प्रवास करतील. गांगुलीच्या म्हणण्यानुसार, सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी आणि विजय हजारे ट्रॉफी स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर यंदा आयपीएल संघाच्या प्रवासाची योजना आखण्यात आली आहे.