IPL 2021 (PC - ANI)

IPL 2021 Schedule: भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (BCCI) ने आयपीएल 2021 च्या तारखांची घोषणा केली आहे. आयपीएलच्या 14 व्या हंगामाची सुरुवात 9 एप्रिलपासून होणार आहे. तसेच आयपीएलचा अंतिम सामना 30 मे रोजी होणार आहे. आयपीएलचा पहिला सामना 9 एप्रिलला चेन्नई येथे खेळला जाणार असून अंतिम सामना 30 मे रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) खेळला जाणार आहे.

आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलच्या रविवारी झालेल्या बैठकीत या हंगामातील तारखांची घोषणा करण्यात आली. यावेळी सर्व सामने एकूण सहा ठिकाणी खेळले जाणार आहेत. यात अहमदाबाद, बेंगळुरू, चेन्नई, दिल्ली, मुंबई आणि कोलकाता यांचा समावेश आहे. 9 एप्रिलला चेन्नई येथे खेळलेला सामना रोहित शर्माच्या नेतृत्वात मुंबई इंडियन्स आणि विराट कोहलीच्या नेतृत्वात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात होणार आहे. (वाचा - IND vs ENG 4th Test 2021: वॉशिंग्टनची ‘सुंदर’ खेळी, रिषभ पंतचे मॅचविनिंग शतक; टीम इंडियाच्या अहमदाबाद टेस्ट विजयाची 5 प्रमुख कारण, जाणून घ्या)

अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलच्या 14 व्या हंगामातील सर्व प्लेऑफ सामने आणि अंतिम सामने खेळले जातील. यावेळी लीग टप्प्यातील सर्व संघ आपापले सामने चार ठिकाणी खेळतील आणि 56 लीग सामन्यात चेन्नई, मुंबई, कोलकाता आणि बेंगळुरू येथे 10-10 मॅत होतील. तसेच अहमदाबाद आणि दिल्ली येथे 8-8 लीग सामने होणार आहेत.

आयपीएलच्या या हंगामातील सर्वात खास बाब म्हणजे सर्व सामने न्यूट्रल ठिकाणी खेळले जातील. दुपारी सुरू होणारा सामना दुपारी 3.30 वाजता सुरू होईल, त्यानंतर संध्याकाळी 7.30 वाजता सुरू होईल. कोरोना साथीच्या संसर्गामुळे आयपीएलचे सुरुवातीचे सामने प्रेक्षकांशिवाय खेळले जातील.