IND vs ENG 4th Test 2021: वॉशिंग्टनची ‘सुंदर’ खेळी, रिषभ पंतचे मॅचविनिंग शतक; टीम इंडियाच्या अहमदाबाद टेस्ट विजयाची 5 प्रमुख कारण, जाणून घ्या
भारत विरुद्ध इंग्लंड, अहमदाबाद टेस्ट (Photo Credit: PTI)

IND vs ENG 4th Test 2021: अहमदाबादच्या (Ahmedabad) चौथ्या कसोटीत सामन्यात भारतीय संघाने (Indian Team) दबदबा कायम ठेवला आणि इंग्लंडचा (England) दारुण पराभव करत एक डाव आणि 25 धावांनी विजय मिळवला. भारताने पहिल्या डाव्यात 160 धावांची आघाडी घेतल्यानंतर मैदानात उतरलेल्या इंग्लिश संघाचे फलंदाज रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) आणि अक्षर पटेलच्या (Axar Patel) फिरकीच्या जाळ्यात अडकले. दोघांनीही प्रत्येकी पाच विकेट घेत अजून एका ऐतिहासिक विजयाची नोंद केली आहे. शिवाय, सामन्यासह टीम इंडियाने चार सामन्यांची ही कसोटी मालिका 3-1 ने जिंकली आहे. इंग्लंडने मालिकेची विजयी सुरुवात केली, पण अखेरचे तीन सामने यजमान संघाने आपल्या नावावर केले आणि एकतर्फी विजय मिळवला. चौथे कसोटी सामना टीम इंडियाने (Team India) का जिंकला याची पाच प्रमुख कारणे खालीलप्रमाणे आहेत. (ICC Test Team Rankings: इंग्लंडला धूळ चारत टीम इंडियाचा टेस्ट टीम क्रमवारीत जलवा, न्यूझीलंडकडून मुकुट काढून घेत पुन्हा बनली नंबर वन)

1. चौथ्या कसोटी सामन्यात इंग्लंडचे फलंदाज अश्विन आणि अक्षर पटेलच्या फिरकीसमोर संघर्ष दिसले. चौथ्या सामन्यात दोन्ही खेळाडूंनी एकूण 17 विकेट घेतल्या. अशास्थितीत अश्विन आणि पटेल यांनी टीम इंडियाच्या विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिले.

2. युवा विकेटकीपर खेळाडू रिषभ पंतनेही टीम इंडियाच्या विजयात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. एका वेळी स्वस्तपणे सेटल होत असताना पंतने 101 धावांचा स्फोटक डाव खेळला आणि संघाला मोठी आघाडी मिळवून दिली.

3. युवा अष्टपैलू खेळाडू वॉशिंग्टन सुंदरने पंतला मैदानात चांगली साथ दिली. त्याचे पहिले शतक हुकले पण त्याने 174 चेंडूत नाबाद 96 धावांची खेळी करत संघाला 365 धावांच्या मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली. सुंदरची ही उत्कृष्ट खेळी नेहमीच चाहत्यांच्या लक्षात राहील.

4. चौथ्या कसोटीच्या दुसर्‍या दिवशी टीम इंडिया नियमित अंतराने विकेट गमावत असताना रोहित शर्माने एका संयमाने फलंदाजी केली. यादरम्यान, त्याने स्टोक्सच्या चेंडूवर बाद होण्यापूर्वी 49 धावांचा महत्त्वपूर्ण खेळी केली.

5. अक्षर पटेल आपल्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीतील फक्त तिसरा सामना खेळत होता, परंतु त्याच्याकडे अनुभवाची कमी असल्याचं कोठेही दिसून आले नाही पटेलने चौथ्या कसोटी सामन्यात नऊ गडी बाद करत 43 महत्त्वपूर्ण धावाही केल्या.

दरम्यान, इंग्लंडविरुद्ध विस्फोटक शतकी खेळीसाठी पंतला 'सामनावीर'चा पुरस्कार देण्यात आले. चौथ्या कसोटी सामन्यात पंतने केवळ 118 चेंडूंचा सामना करत 13 चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने 101 धावांची उत्कृष्ट शतकी कामगिरी केली.