शिमरोन हेटमायर (Photo Credits: Twitter)

गुरुवारी आयपीएलच्या (IPL) लिलावात आगामी 2020 हंगामासाठी खेळाडूंची बोली लावली. या खेळाडूंमध्ये असेही नाव होते ज्यांनी काही दिवसांपूर्वी टीम इंडियाविरुद्ध पहिल्या वनडे सामन्यात भारताची क्लास घेतली होती. 22 वर्षीय वेस्ट इंडिजचा फलंदाज शिमरोन हेटमायर (Shimron Hetmyer) याचा या खेळाडूंमध्ये समावेश आहे. आपल्या स्फोटक शतकाच्या जोरावर पहिल्या वनडे सामन्यात टीम इंडियाला पराभूत केले आणि गुरुवारी लिलावात तो लक्षाधीश झाला. यानंतर त्याने जोरदार नृत्य करत आनंद व्यक्त केला. हेटमायर मागील वेळी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघाकडून खेळला होता, पण यावेळी विराट कोहली याच्या नेतृत्वातील संघाने त्याला रिलीज केले.  यामुळे हेटमायरला फायदा झाला आणि दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) त्याला 7 कोटी 70 लाख रुपयांमध्ये त्यांच्या टीममध्ये समाविष्ट केले. यावेळी तो लिलावात दिल्ली कॅपिटलची सर्वात महागडी खरेदी असल्याचेही सिद्ध झाले. (IPL 2020 Auction: पॅट कमिन्स, ग्लेन मॅक्सवेल, शेल्डन कोटरेल बनले करोडपती; जाणून घ्या कोणावर लागली कितीची बोली, कोण राहिले अनसोल्ड)

तिसऱ्या वनडे सामन्यापूर्वी हॉटेलमध्ये विश्रांती घेत असलेला हेटमायर आरामात टीव्हीवर आयपीएलचा लिलाव पाहत होता. जेव्हा त्याची बोली लागली आणि कळले की त्याला एक मोठा जॅकपॉट लागला आहे तेव्हा तो पलंगावर चढला आणि नाचू लागला. याचा व्हिडिओ दिल्ली कॅपिटलने पोस्ट केला आहे. या व्हिडिओद्वारे डीसीने हेटमायरकडून चाहत्यांसाठी खास मेसेज मागितला.

22 वर्षीय हेटमायरने भारत-विंडीज मालिकेच्या पहिल्या वनडे सामन्यात 139 धावांची तुफान खेळी केली आणि यामुळे एकतर्फी सामन्यात भारताला पराभूत केले. हेटमायरसाठी दिल्लीसह कोलकाता नाईट रायडर्स आणि राजस्थान रॉयल्स यांनीही बोली लावली, पण अखेरीस दिल्लीला त्याला खरेदी करण्यात यश आले. 2019 च्या आयपीएलमध्ये हेटमायरने बंगळुरूकडून खेळत आयपीएलमध्ये पदार्पण केलेहोते. आरसीबीने (RCB) त्याला चार कोटी 20 लाखांमध्ये खरेदी केले होते. दरम्यान, ऑस्ट्रेलियन वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स (Pat Cummins) आयपीएलच्या इतिहासातील विदेशी खेळाडूंमधील सर्वात महाग आणि या मोसमातील सर्वात महाग खेळाडू ठरला. कमिन्स 20 मिलियनच्या बेस प्राइससह आला होता. बेन स्टोक्सला 2017 मध्ये राइजिंग पुणे सुपरगिअमंट्सने 14.50 कोटी रुपयांत खरेदी केले होते. दुसरीकडे, युवराज सिंह (Yuvraj Singh) या सर्वात महागडा भारतीय खेळाडू आहे. युवीला दिल्ली कॅपिटल्सने 16 कोटींमध्ये खरेदी केले होते.