आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: IANS)

इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 13 व्या सत्रात ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज पॅट कमिन्स (Pat Cummins) याच्यासाठी दुसरी सर्वात मोठीही बोली लावण्यात आली. कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) ने कमिन्ससाठी सर्वात मोठी 15 कोटी 50 लाखांची बो ली लावली. आयपीएल 2020 साठी नाईट रायडर्सने दुसरी मोठी बोली लावली. यापूर्वी आयपीएलच्या लिलावात कोलकाता संघाने इंग्लंडचा विश्वचषक विजेता कर्णधार इयन मॉर्गन याला 5.25 कोटी रुपयांना विकत घेतले. यानंतर, केकेआरने कमिन्सवर आतापर्यंतची दुसरी सर्वात मोठी बोली लावली. 26 वर्षीय पॅट कमिन्स आता कोलकाता संघाकडून खेळताना दिसणार आहे. यापूर्वी तो दिल्लीच्या राजधानीत खेळला आहे. दुसरीकडे, ऑस्ट्रेलियाच्याच ग्लेन मॅक्सवेल याच्यावर 10.75 कोटींची बोली लागली. पंजाबच्या संघाने पुन्हा त्याला कोट्याधीश बनवत संघात सामिल केले. (IPL 2020 Auction: मुंबईतील पाणीपुरी विक्रेता ठरला 2 कोटी 40 लाख रुपयांचा मालक; Yashasvi Jaiswal याची हटके कहाणी)

भारतीय खेळाडूंबद्दल बोलले तर फिरकी गोलंदाज पियुष चावला (Piyush Chawla) सर्वात महागडा ठरला. तीन वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जने 6 कोटी 75 लाखांत पियुषला खरेदी केले. यंदाच्या लिलावात भारतीय खेळाडूला मिळालेली ही सर्वात मोठी बोली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूंशिवाय युवा खेळाडूंनाही चांगला भाव मिळाला. भारतीय खेळाडूंमध्ये रहस्यमय गोलंदाज वरुण चक्रवर्ती (Varun Chakravarthy), यशस्वी जयस्वाल (Yashasvi Jaiswal), अंडर-विश्वचषकसाथीचा कर्णधार प्रियम गर्ग (Priyam Garg) आणि विराट सिंह (Virat Singh) यासारख्या खेळाडूंना मोठी रक्कम देऊन खरेदी करण्यात आले.

इथे पाहा अनसोल्ड खेळाडूंची यादी: हनुमा विहारी, चेतेश्वर पुजारा, युसूफ पठाण, मार्क वूड, बेन कटिंग, के. एस भारत, शाहरुख खान, रोहन कदम, अँड्र्यू टाय, कोलिन डी ग्रैंडहोम, कुशल परेरा, केसरीक विल्यम्स, जेसन होल्डर, लिअम प्लंकेट, एव्हिन लुईस, कॉलिन इंग्राम, मार्टिन गुप्टिल, कार्लोस ब्रेथवेट, एंडिले फेलुक्वायो, अल्झारी जोसेफ, शाई होप, मुश्फिकुर रहीम, हेनरिक क्लॅसेन, टिम साउथी, मनोज तिवारी, ईश सोढ़ी, एडम ज़म्पा, हेडन वॉल्श जूनियर, कुलवंत खेजरोलिया, एनरिच नॉर्टजे, नूर अहमद, बरिंदर सरन, मार्क वुड, अ‍ॅडम मिलने, जेम्स पॅटिन्सन, सीन एबॉट, आर विनय कुमार, नमन ओझा, स्टुअर्ट बिन्नी, कॉलिन मुनरो, ऋषी धवन.

लिलाव झालेल्या खेळाडूंची यादी:

क्रिस लिन 2 कोटी (मुंबई इंडियन्स), इयन मॉर्गन 5.25 कोटी (कोलकाता नाईट रायडर्स), रॉबिन उथप्पा 3 कोटी (राजस्थान रॉयल्स), जेसन रॉय 1.5 कोटी (दिल्ली कॅपिटल्स), आरोन फिंच 4.40 (रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर), राहुल त्रिपाठी 60 लाख (केकेआर), विराट सिंह 1.9 कोटी (सनरायझर्स हैदराबाद), प्रियम गर्ग 1.9 कोटी (हैदराबाद), शिमरोन हेटमायर 7.75 कोटी (दिल्ली कॅपिटल्स), डेविड मिलर 75 लाख (राजस्थान), सौरभ तिवारी 50 लाख (मुंबई), टॉम बैंटन 1 कोटी (कोलकाता), जयदेव उनादकट 3 कोटी (राजस्थान), नाथन कूल्टर-नाइल 8 कोटी (मुंबई), शेल्डन कॉटरेल 8.5 कोटी (किंग्स इलेव्हन पंजाब), पियुष चावला 6.75 कोटी (चेन्नई सुपर किंग्स), आकाश सिंह 20 लाख (राजस्थान), कार्तिक त्यागी 1.3 कोटी (राजस्थान), ईशान पुरेल 20 लाख (राजस्थान), एम सिद्धार्थ 20 (कोलकाता), रवी बिश्नोई 2 कोटी (पंजाब), जोश हेजलवुड 2 कोटी (चेन्नई), मोहसीन खान 20 लाख (मुंबई), केन रिचर्डसन 4 कोटी (बंगलोर), ओशेन थॉमस 50 लाख (राजस्थान), प्रवीण तांबे 20 लाख (राजस्थान), मोहित शर्मा 50 लाख (दिल्ली), तुषार देशपांडे 20 लाख (दिल्ली), डेल स्टेन 2 कोटी (बंगलोर), एंड्रयू टाई 1 कोटी (राजस्थान), एलेक्स केरी 2.4 कोटी (दिल्ली), प्रभसिमरन सिंह 55 लाख (पंजाब), जोशुआ फिलिप्स 20 लाख (बैंगलोर), ग्लेन मैक्सवेल 10.75 कोटी (पंजाब), क्रिस वोक्स 1.5 करोड (दिल्ली), पॅट कमिन्स 15.5 कोटी (कोलकाता), सॅम कुर्रान 5.5 कोटी (चेन्नई), क्रिस मॉरिस 10 कोटी (बंगलोर), दीपक हुड्डा 50 लाख (पंजाब), वरून चक्रवर्ती 4 कोटी कोलकाता, यशस्वी जयस्वाल 2.4 कोटी (राजस्थान रॉयल्स), मिशेल मार्श 2 कोटी (हैदराबाद), जेम्स निशम 50 लाख (पंजाब), फेबियन एलन 50 लाख (हैदराबाद), मार्कस स्टोइनिस 4.8 कोटी (दिल्ली), टॉम कुरन 1 कोटी (राजस्थान), इसुरु उदाना 50 लाख (बंगलोर), क्रिस जॉर्डन 3 कोटी (पंजाब).