IPL 2021 Auction: मुंबई इंडियन्सने एकेकाळी रिलीज केलेले 'हे' धडाकेबाज खेळाडू दुसऱ्या फ्रँचायझी संघाकडून गाजवतायेत आयपीएल, नावं जाणून व्हाल हैराण
मुंबई इंडियन्स (Photo Credit: Twitter)

IPL 2021: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) आजवरच्या इतिहासात मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) सर्वात यशस्वी संघ म्हणून उदयास आला आहे. मागील 13 हंगामात रोहित शर्माच्या नेतृत्वात या संघाने 5 वेळा जेतेपद जिंकले आहे. 5-वेळा आयपीएल (IPL) चॅम्पियन्स मैदानात आणि मैदानाबाहेरच्या स्मार्ट क्रिकेटींग निर्णयासाठी प्रसिध्द आहेत. मुंबई इंडियन्सने बरीच मॅच विनर्स समोर आणण्याचा अभिमान बाळगला आहे. याशिवाय, 13 वर्षात संघात अनेक बदल न केल्याबद्दल आणि सातत्याने पाठिंबा देऊन खेळाडूंचा आत्मविश्वास वाढवण्याबद्दलही त्यांचे कौतुक केले जाते. तथापि, बऱ्याच वर्षांत मुंबईनेही असे काही कठोर निर्णय घेतले जे त्यांना महागात पडले आहे. आज आपण अशा काही खेळाडूंबद्दल जाणून घेणार आहोत ज्यांना मुंबई फ्रँचायझीने मागील अनेक 13 वर्षात रिलीज केले, आणि दुसऱ्या संघात सामील होत त्यांनीही आपली कामगिरी उंचावली आहे. (IPL 2021 Auction: लसिथ मलिंगाच्या जागी मुंबई इंडियन्स हे 3 गोलंदाज होऊ शकतात सामील, फलंदाजांवर पडू शकतात भारी)

1. ड्वेन ब्रावो

ब्रावो पहिल्या हंगामापासून आयपीएलचा भाग राहिला आहे, पण चेन्नई सुपर किंग्स नाही तर विंडीजच्या या तडाखेबाज अष्टपैलूने सुरुवातीला मुंबई इंडियन्सची निळी जर्सी परिधान केली होती. तो 2008 ते 2010 पर्यंत संघात राहिला. पहिले दोन वर्ष सभ्य कामगिरी केलेल्या ब्रावोचा फॉर्म तिसऱ्या वर्षी घसरला. 2010 हंगामानंतर सर्व संघांना फक्त चार खेळाडूंना रिटेन करण्यास सांगितले होते आणि मुंबईने मुख्य खेळाडूंना कायम ठेवले. 2011 मध्ये ब्रावोला कोणताही खरेदीदार मिळाला नाही पण सुदैवाने 2012 मध्ये सुपर किंग्जने त्याला विकत घेतले आणि धोनीच्या नेतृत्वात त्याने फिनिक्स भरारी घेतली.

2. जोस बटलर

बटलर 2016 आणि 2017 आयपीएलच्या आवृत्तीत मुंबई इंडियन्सकडून खेळला आहे व फ्रँचायझीने रिलीज त्याने 2017 मध्ये 10  सामन्यात 272 धावा केल्या. 2018 मध्ये त्याला राजस्थान रॉयल्सची साथ मिळाली आणि त्याने कौशल्य दाखवत 13 सामन्यात 548 धावा ठोकल्या. बटलर तेव्हापासून रॉयल्सकडून खेळत असून संघातील महत्त्वपूर्ण खेळाडूंपैकी एक बनला आहे.

3. शिखर धवन

आयपीएलचा पहिला सीझन दिल्लीसाठी खेळल्यानंतर शिखर धवनची पुढील सत्रात आशिष नेहराच्या बदल्यात मुंबई इंडियन्सकडे ट्रेडिंग झाली. आयपीएलच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या सत्रात धवन मुंबईकडून खेळला, पण त्याला ज्या काही संधी मिळाल्या त्याचा त्याला पुरेपूर उपयोग करता आला नाही आणि नंतर 2011 आयपीएलपूर्वी त्याला रिलीज करण्यात आले. धवन सध्या आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा करणारा पाचवा खेळाडू असून त्याने 5000 हुन अधिक धावा केल्या आहेत. धवनला रिलीज करणे मुंबईच्या रणनीतीतील सर्वात मोठी चूक होती.

4. युजवेंद्र चहल

मुंबई इंडियन्सनेच प्रथम युजवेंद्र चहल आयपीएलमध्ये विकत घेतले होते. 2011 ते 2013 दरम्यान चहल तीन वर्षांच्या फ्रँचायझीचा भाग होता, परंतु त्याला एकाच सामना खेळण्याची संधी मिळाली. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने 2014 आयपीएलच्या लिलावात त्याला खरेदी केले आणि बाकी आता सर्व इतिहास जमा झाले आहे.

5. श्रेयस गोपाल

श्रेयसदेखील असाच एक खेळाडू आहे ज्याने आपल्या आयपीएल कारकीर्दीची सुरुवात मुंबई इंडियन्सबरोबर केली होती पण वेगळ्या फ्रँचायझीमध्ये गेल्यानंतर त्याला महत्त्व प्राप्त झाले. 2014 मध्ये मुंबईने गोपालला खरेदी केले आणि चार वर्ष संघाचा भाग होता पण तो फक्त 6 सामनेच खेळू शकला. 2018 मध्ये तो राजस्थान संघात सामील झाला ज्यांनी त्याला आपले कौशल्या दाखवण्याची पुरेपूर संधी मिळाली आणि मैदान गाजवत आहे.