IPL 2021 Auction: लसिथ मलिंगाच्या जागी मुंबई इंडियन्स हे 3 गोलंदाज होऊ शकतात सामील, फलंदाजांवर पडू शकतात भारी
Lasith Malinga (Photo Credits: IANS)

IPL 2021 Auction: इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14व्या हंगामाची तयारी सुरु झाली आहे. आगामी हंगामापूर्वी सर्व संघांनी बुधवारी आपल्या काही खेळाडूंना बाहेरचा रस्ता दाखवली आहे. वृत्तानुसार आयपीएल (IPL) 2021 साठी मिनी लिलाव पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये आयोजित केला जाणार आहे. या लिलावात अनेक परदेशी खेळाडू सहभागी होतील. अशा परिस्थितीत श्रीलंकेचा अनुभवी वेगवान गोलंदाज लसिथ मलिंगाच्या (Lasith Malinga) जागी एखाद्या पात्र खेळाडूला मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) संघात संधी मिळू शकते. फ्रँचायझीने खेळाडूंची यादी जाहीर केल्यानंतर मलिंगाने फ्रँचायझी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली, ज्यानंतर मुंबई संघात मोठी जागा रिक्त झाली आहे. अशास्थितीत आगामी लिलावात मुंबईचे लक्ष मलिंगाची जागर भरून काढणाऱ्या गोलंदाजासाठी बोली लागवण्यावर असेल. मलिंगा मुंबई संघातील एक मुख्य आणि अनुभवी गोलंदाज होता. जसप्रीत बुमराहच्या साथीने आपल्या वेगवान हल्ल्याने विरोधी संघावर दोघे भारी पडले होते. (IPL 2021: RCB ने रिटेन करत AB de Villiers 100 कोटी क्लबमध्ये एंट्री करणारा बनला पहिला विदेशी क्रिकेटर, टॉप-3 मध्ये भारतीयांचे अधिराज्य)

1. मिचेल स्टार्क

ऑस्ट्रेलियाचा स्टार वेगवान गोलंदाज मिशेल स्टार्कचे नाव या यादीत पहिले येते. स्टार्कने आपल्या वेगवान हल्ल्याने बड्या फलंदाजांच्या विकेट घेतल्या आहेत. स्टार्कला आयपीएल खेळण्याचा अनुभवही आहे. अशा परिस्थितीत मुंबईचा संघ मलिंगाची जागा भरून काढण्यासाठी मिचेल स्टार्कला संघात समाविष्ट करण्याचा प्रयत्न करेल.

2. मुस्तफिजुर रहमान

या यादीत बांग्लादेश संघाचा अनुभवी वेगवान गोलंदाज मुस्तफिजुर रहमान दुसरा गोलंदाज आहे. रहमान यापूर्वीही मुंबई संघाचा सदस्य होता, परंतु गेल्या काही मोसमात राष्ट्रीय संघात प्राधान्य दिल्याने त्याला आयपीएल खेळण्याची संधी मिळाली नाही. परंतु रहमान पुन्हा एकदा आयपीएल खेळण्यास तयार असल्याने मुंबई त्याच्यावर मोठी बोली लावून त्याला संघात सामील करू शकते.

3. काईल जेमीसन

न्यूझीलंड क्रिकेट संघाचा घातक युवा अष्टपैलू खेळाडू काइल जेम्सन यंदा आयपीएल लिलावात चांगलेच लक्ष वेधू शकतो. अलीकडच्या काळात जेम्ससनने किवी संघाकडून चांगली गोलंदाजी केली आहे. जेमीसनने किवी संघाकडून 4 टी-20 सामन्यात 3 विकेट घेतल्या आहेत, पण त्याचा सध्याचा फॉर्म लक्षात घेता फ्रँचायझी त्याच्यात बोली लागवण्यासाठी उत्सुकता दर्शवू शकतात.