IPL 2021: ‘तू ऑरेंज कॅप जिंकणार नाही’, विराट कोहलीच्या सल्ल्यामुळे कसा बदलला रायन परागचा खेळ
विराट कोहली आणि रियान पराग (Photo Credit: PTI, Instagram)

IPL 2021: राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) युवा अष्टपैलू रियान परागने भारतीय आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) कर्णधार विराट कोहलीच्या  (Virat Kohli) सल्ल्यानंतर आपला दृष्टीकोन कसा बदलला याबाबत खुलासा केला आहे. परागने म्हटले की मागील वर्षी कोहलीशी त्याची चर्चा झाली आणि भारतीय संघाचा कर्णधार त्याला म्हणाला की ऑरेंज कॅपची (Orange Cap) चिंता करू नको. कोहलीने केवळ 20 किंवा 30 धावा करण्यावरही लक्ष केंद्रित करण्यास सांगितल्याचे रियानने उघड केले. त्यांनतर, तेव्हापासून त्याने केवळ त्याच्या योगदानामुळे संघाला कसा फायदा होतो याचा विचार केला असे म्हटले. राजस्थान रॉयल्सच्या इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2021 मधील पहिल्या सामन्यात या 19 वर्षीय रियानने 11 चेंडूंत 25 धावांचा डाव खेळला. Vricbuzz ला दिलेल्या मुलाखतीती परागने म्हणाले की, युएईमध्ये झालेल्या आयपीएलच्या (IPL) मागील सत्रात कोहलीने त्याला सकारात्मक खेळण्याचा सल्ला दिला होता असं म्हटलं. (IPL 2021: विराट कोहली याच्यासोबत Rajasthan Royals संघाच्या युवा खेळाडूला करायचाय ‘बिहू’ डान्स)

“गेल्या आयपीएल दरम्यान माझी विराट कोहलीशी चर्चा झाली. त्यांनी मला खास सांगितले की ‘तुला ऑरेंज कॅप मिळणार नाही. तू 5 किंवा 6 व्या क्रमांकावर फलंदाजी करता असताना ऑरेंज कॅपबद्दल विचार करण्यात अर्थ नाही. तू फक्त त्या महत्त्वपूर्ण 20 किंवा 30 धावा कसे मिळवू शकता याचा विचार करं आणि जेव्हा तुम्हाला एखाद्या महत्त्वपूर्ण टप्प्यात जाण्याची संधी मिळते तेव्हा आपण संघाकडून कसे कार्य करू शकता याचा विचार कर. त्यामुळे ते माझ्या मनात भरले आणि आता मी किती धावा मिळवतो याचा विचार करत नाही, माझ्या धावांनी संघाला कसा फायदा होत आहे याचा मी विचार करतो,” परागने क्रिकबझशी चॅटमध्ये सांगितले. आयपीएलसारख्या स्पर्धेत एक क्रिकेटपटू जगातील सर्वोत्कृष्ट खेळाडूंशी कसा संपर्कात येतो याबद्दल परागने उघड केले. राजस्थान रॉयल्सच्या या युवा अष्टपैलूने सांगितले की, विराट कोहली आणि एमएस धोनीसारख्या दिग्गजांविरुद्ध खेळणे एखाद्या क्रिकेटरला मानसिकदृष्ट्या बळकट बनवते.

गुरुवारी मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध सामन्यात पुन्हा एकदा रियान परागच्या कामगिरीवर सर्वांचे लक्ष असेल. यंदाच्या आयपीएलच्या सुरुवातीच्या सामन्यात परागला अधिक योगदान देता आले नाही त्यामुळे आगामी सामन्यात तो धावांची कसर भरून काढण्यावर नक्किरच भर देईल.