रियान पराग आणि विराट कोहली (Photo Credit: PTI)

IPL 2021: राजस्थान रॉयल्सला (Rajasthan Royals) इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 2020 च्या एका सामन्यात विजयी रेष पार करून दिलेल्या फलंदाज रियान परागचा (Riyan Parag) ‘बिहू डान्स’ (Bihu Dance) सर्वाधिक चर्चेत आला होता. विजयी शॉट मारल्यानंतर दुबई स्टेडियमवर परागने पारंपारिक असमिया बिहू नृत्य सादर केले. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यातील आयपीएल (IPL) 2020 च्या 26व्या सामन्यात घटना घडली. आयपीएल 2021 च्या पार्श्वभूमीवर कोणत्या खेळाडूसह आपण ‘बिहू डान्स’ करण्याची इच्छा आहे हे प्रकट केले. 159 धावांचा पाठलाग करताना रॉयल्सची स्थिती 78/5 अशी होती जेव्हा पराग आणि राहुल तेवतियाच्या जोडीने नाबाद 85 धावांची भागीदारी करत संघाला पाच विकेट्सने शानदार विजय मिळवून दिला. परागने 26 चेंडूत 42 धावा काढल्या ज्यात दोन चौकार आणि तितक्याच षटकारांचा समावेश होता. (Riyan Parag Dance: सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध सामन्यात विजयी षटकार मारल्यानंतर रियान पराग याने मैदानातच केला डान्स; पाहा व्हिडिओ)

एका चाहत्याच्या प्रश्नाला उत्तर देताना रियान परागने कबूल केले की त्याला रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघाचा कर्णधार विराट कोहलीसह (Virat Kohli) बिहू नृत्य करायचं आहे. विराट कोहली हा नेहमीच त्याचा आदर्श होता आणि माणूस म्हणून त्याचे कौतुकही करतो असे 19 वर्षीय परागने म्हटले. “हो, मला विराट कोहलीसोबत बिहू करायचा आहे. विराट कोहली नेहमीच माझा रोल मॉडेल आहे. मी अर्थातच एक खेळाडू म्हणून परंतु माणूस म्हणूनहीत्याचे कौतुक करतो. म्हणून विराट कोहली,” राजस्थान रॉयल्सच्या ‘यूट्यूब’ पेजवर पोस्ट केलेल्या प्रश्नावर प्रतिक्रिया दिली. शिवाय, आसाममध्ये जन्मलेल्या या क्रिकेटपटूने विराट कोहलीची कव्हर ड्राईव्ह आणि त्याचा सहकारी जोस बटलरच्या स्कूप शॉटचे अनुकरण करण्याची देखील इच्छा व्यक्त केली. त्याचबरोबर परागला असे वाटते की शिकण्याची इच्छा असूनही, तो करू शकत नाही.

दरम्यान, परागची ही इच्छा पूर्ण होते की नाही हे तर केवळ आयपीएल 2021 मध्येच कळेल पण राजस्थानच्या संघाला त्यांच्या नृत्यापेक्षा त्याच्या बॅटने अधिक धावांची आवश्यकता असेल आणि येत्या हंगामात तो कशी कामगिरी करतो हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.