Riyan Parag (Photo Credit: PTI)

आयपीएलच्या तेराव्या हंगामातील 26 व्या सामन्यात राजस्थान रॉयलच्या (RR) संघाने सनरायझर्स हैदराबादच्या (SRH) संघावर रोमांचक विजय मिळवला आहे. हैदाबादच्या संघाने दिलेल्या 159 धावांचा पाठलाग करताना असताना राजस्थानचा संघ डगमताना दिसला. राजस्थानचे 78 धावांवर 5 विकेट्स गमावले. मात्र, मैदानात आलेल्या राहुल तेवातिया (Rahul Tewatia) आणि रियान पराग (Riyan Parag) यांनी केलेल्या नाबाद 85 धावांच्या भागिदारीच्या जोरावर राजस्थान संघाने हातातून निसटलेल्या सामन्यावर विजय मिळवला आहे. दरम्यान, या सामन्यात अखेरच्या 2 चेंडूत राजस्थानच्या संघाला 2 धावांची गरज असताना रियान परागने षटकार लगावला. रियान परागने विजयी षटकार लगवल्यानंतर मैदानाच नाचत आनंद व्यक्त केला. या क्षणाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

या सामन्यात हैदराबादच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार प्रथम फलंदाजी करण्यासाठी मैदानात आलेल्या हैदराबादच्या संघाला 20 षटकात केवळ 158 धावापर्यंत मजल मारता आली आहे. राजस्थानकडून जोफ्रा आर्चर, कार्तिक त्यागी आणि जयदेव उनाडकट या तिघांनी शिस्तबद्ध गोलंदाजी करत प्रत्येकी 1-1 विकेट्स मिळवला. हैदबादच्या संघाने दिलेल्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी मैदानात उतरलेल्या राजस्थानचा संघ संघर्ष करताना दिसला. राजस्थानने 12 षटकांत पाच गड्यांच्या मोबादल्यात फक्त 78 धावा केल्या होत्या. त्यानंतर तेवातिया आणि रियान पराग जोडीने सुरुवातीला सावध फलंदाजी केली. अखेरच्या काही षटकांत दोघांनीही दमदार फलंदाजी करत संघाला अशक्यप्राय विजय मिळवून दिला. हे देखील वाचा- Rape Threat to MS Dhoni's Daughter Ziva: एमएस धोनीच्या 5 वर्षीय मुलगी झिवावर बलात्काराची धमकी देणाऱ्या व्यक्तीला गुजरातच्या कच्छ येथून अटक

व्हिडिओ-

हैदबादच्या विरुद्ध सामन्या विजय मिळवत राजस्थानच्या संघ आयपीएलच्या गुणतालिकेत सहाव्या स्थानावर पोहचला आहे. सध्या गुणतालिकेत दिल्ली कॅपिटल्सचा संघ अव्वल स्थानावर आहेत. तर, मुंबई इंडियन्सचा संघ दुसऱ्या स्थानावर आहे. या हंगामात चेन्नई सुपर किंग्ज आणि हैदराबादचा संघ गुणतालिकेत तळाशी आहेत.