झिवा सोबत एमएस धोनी (Photo Credits: Instagram)

Rape Threat to MS Dhoni's Daughter Ziva: चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार आणि भारताचा वर्ल्ड कप विजेता माजी कर्णधार महेंद्र सिंह धोनीची मुलगी झिवाला सोशल मीडियावरून बलात्काराच्या धमक्या दिल्या प्रकरणी पोलिसांनी गुजरात येथील कच्छच्या मुंद्रा येथून एका व्यक्तीला करण्यात आली आहे. बुधवारी अबू धाबी येथे दिनेश कार्तिकच्या कोलकाता नाईट रायडर्सविरुद्ध (Kolkata Knight Riders) चेन्नईच्या 10 धावांनी पराभवानंतर धोनी आणि त्याची पत्नी साक्षीच्या इन्स्टाग्राम अकाउंट्सवर कथित धमकी दिली गेली होती. या प्रकरणात झारखंडच्या रांची येथील रतू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. दुसरीकडे, 'न्यू इंडियन एक्सप्रेस'च्या अहवालानुसार, या विषयाची दखल घेत रांची पोलिस सावध झाले आहेत आणि धोनीच्या फार्महाऊसवर सुरक्षा वाढवली आहे, जिथे खेळाडूची पत्नी व मुलगी सध्या राहत आहेत, तर माजी भारतीय यष्टिरक्षक-फलंदाज सध्या चालू असलेल्या इंडियन प्रीमिअर लीगच्या 2020आवृत्तीसाठी संयुक्त अरब अमिराती (United Arab Emirates) येथे आहे. (MS Dhoni's Daughter Ziva Gets Rape Threats: एमएस धोनीच्या रांची फार्महाऊसच्या सुरक्षेत वाढ, माथेफिरूच्या धमकीनंतर पोलिसांची कारवाई)

दरम्यान, शनिवारी धोनीच्या सीएसकेला आयपीएलमधील 5व्या पराभवाला सामोरे जावे लागले. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने सीएसकेचा 37 धावांनी पराभव केला. धोनी सध्या युएईमध्ये आपल्या संघाचं नेतृत्व करतो आहे, पण आयपीएल 2020 मध्ये अद्याप धोनी आणि टीमला आपली चमक दाखवता आलेली नाही. त्यामुळे धोनीवर सातत्याने टीका केली जात आहे. मात्र, केकेआरविरुद्ध सामन्यातील पराभवानंतर सोशल मीडियावर यूजर्सने हद्दच पार केली.

चेन्नईने आयपीएलमध्ये आतापर्यंत 7 सामने खेळले असून त्यांना केवळ 2 सामन्यात विजय, तर 5 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला आहे. सीएसके आयपीएलमधील दुसरा यशस्वी संघ आहे. आयपीएल इतिहासात सुपर किंग्सने आजवर 3 विजेतेपद (2010, 2011 आणि 2018) जिंकले आहेत.