IPL 2021, RR vs CSK: चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) कर्णधार महेंद्र सिंह धोनीने (MS Dhoni) आज संध्याकाळी इंडियन प्रीमियर लीगच्या (Indian Premier League) 14 व्या हंगामात नवीन विक्रम प्रस्थापित केला आहे. कर्णधार म्हणून तो आयपीएल (IPL) मधील 200 व्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्सच्या नेतृत्वाची धुरा सांभाळणार आहे. धोनीने राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals) विरुद्ध यंदाच्या मोसमातील 47 व्या सामन्यात मैदानावर टॉससाठी उतरताच ही खास कामगिरी केली. चेन्नईच्या कर्णधाराने केलेला हा विक्रम मोडणे अनेक वर्षासाठी खूप कठीण दिसत आहे. धोनीने इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात नोंदवलेला हा अनोखा विक्रम करण्यास अनेक मोठे दिग्गज खेळाडूही तरसतात. धोनी टी-20 लीगच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधारांपैकी एक आहे आणि तीन आयपीएल विजेतेपद आणि प्लेऑफ पात्रतेचा अविश्वसनीय विक्रम त्याच्या नावावर आहे. आयपीएल 2021 च्या हंगामातही, धोनीचे सुपर किंग्स आतापर्यंत 11 पैकी 9 सामने जिंकून प्लेऑफ फेरीत प्रवेश करणारा पहिला संघ ठरला. (IPL 2021, RR vs CSK: राजस्थान रॉयल्सने नाणेफेक जिंकली, चेन्नई सुपर किंग्जला पहिले फलंदाजीची दिली संधी)
शनिवार, 2 ऑक्टोबर जगातील महान कर्णधारांपैकी एक धोनीसाठी अतिशय खास दिवस असणार आहे. या सामन्यात त्याने स्पर्धेत कर्णधार म्हणून तसेच आयपीएल फ्रँचायझी टीम चेन्नईचा कॅप्टन म्हणून 200 सामने पूर्ण केले. धोनी आतापर्यंत चेन्नई आणि पुणे सुपर जायंट्सच्या संघाकडून खेळला आहे. दोन्ही संघांचे कर्णधार असताना संघाला मोठे यश मिळाले आहे. धोनीच्या कॅप्टन्सी रेकॉर्डबद्दल बोलायचे तर आतापर्यंत धोनीने आयपीएलमध्ये एकूण 199 सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. 2008 ते 2021 दरम्यान त्याच्या नेतृत्वात संघाने एकूण 119 सामने जिंकले आहेत तर 79 सामने गमावले आहेत. धोनी हा एकमेव कर्णधार आहे ज्याच्या संघाने 100 सामने जिंकले आहेत. आतापर्यंत या चॅम्पियन कर्णधाराने चेन्नईसाठी 185 सामन्यांत तर पुण्याच्या 14 सामन्यांमध्ये नेतृत्व केले आहे.
दरम्यान, आयपीएलमध्ये कर्णधारपदाच्या बाबतीत ज्या कर्णधाराचे नाव धोनीच्या नावावर येते त्याने यंदाच्या हंगामानंतर कर्णधार पदावरून पायउतार होण्याचा निर्णय घेतला आहे. रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहलीने आतापर्यंत 136 सामन्यांमध्ये संघाचे नेतृत्व केले आहे. यानंतर गौतम गंभीरचे नाव येते ज्याने एकूण 129 आयपीएल सामन्यांमध्ये कर्णधारपद भूषवले आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने 126 सामन्यांमध्ये कर्णधार म्हणून संघाचे नेतृत्व केले आहे.