IPL 2021: हरभजन सिंह याचा चेन्नई सुपर किंग्ज संघासोबतचा प्रवास थांबला
Harbhajan Singh | (Photo Credit-Facebook)

इंडियन प्रीमियर लीग (IPL 2021) साठी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या लिलावापूर्वी हरभजन सिंह (Harbhajan Singh) याचा चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघासोबतचा प्रवास संपुष्टात आला आहे. ऑफ स्पिनर हरभजन सिंह (Harbhajan Singh) याने ट्विटरच्या माध्यमातून स्वत:हून ही माहिती दिली. वय वर्षे 40 असलेला हा गोलंदाज गेल्या दोन पर्वांपासून सीएसके (CSK) संघाचा घटक राहिला होता. आईपीएल 2020 मध्ये काही व्यक्तिगत कारणांमुळे हा क्रिकेटपटू खेळू शकला नव्हता. त्यात 2020 मध्ये कोरोना व्हायरस संसर्गाच्या संकटामुळे आयपीएल सामने यूएई येथे खेळण्यात आले.

हरभज न सिंह याला चेन्नई सुपर किंग्ज ने आयपीएल 2018 मध्ये आपल्या संघात सहभागी करुन घेतले होते. मुंबई इंडियन्स संघाचा घटक राहिलेला हरभजन याला बेस प्राइस (2 कोटी रुपये) मध्ये चेन्नई सुपर किंग्ज संघाने लिलावात विकत घेतले होते हरभजन सिंह याने सीएसके साठी खेळताना आयपीएल 2018 मध्ये 13 सामन्यांमध्ये 7 विकेट घेतल्या होत्या. तर आयपीएल 2019 मध्ये त्याने 11 सामन्यांमध्ये 16 विकेट्स घेतल्या होत्या.

हरभजन सिंह याने ट्विट करुन माहिती देताना सांगितले की, आता तो चेन्नई सुपर किंग्ज संघासोबतचा प्रवास थांबवत आहे. चेन्नई सुपर सोबत माझा करार संपत आहे. या संघासोबत खेळतानाचा अनुभव अतिशय उत्तम राहिला. सुंदर आठवणी आणि काही चांगले मित्र बनले. या सर्वांना एणाऱ्या काळात आठवणीत ठेवेन. धन्यवाद चेन्नई सुपर किंग्ज व्यवस्थापन, कर्मचारी वर्ग आणि चाहते .... दोन जबरदस्त वर्ष... ऑल द बेस्ट अशा शब्दात हरभजन सिंह याने ट्विटरवर पोस्ट लिहीली आहे. (हेही वाचा, IPL 2021: आयपीएलसाठी आज विविध संघाकडून केली जाणार खेळाडूंची घोषणा, दिग्गजांच्या डोक्यावर टांगती तलवार)

हरभजन सिंह हा 150 विकेट सोबत आयपीएल इतिहासातील एक यशस्वी खेळाडू राहिला आहे. त्याने या लीगमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडूंच्या यादीत स्थान मिळवले आहे. या यादित लसिथ मलिंगा (170), अमित मिश्रा (160), पीयूष चावला (156) और ड्वेन ब्रावो (153) यांचा समावेश आहे.