IPL 2021: आयपीएलसाठी आज विविध संघाकडून केली जाणार खेळाडूंची घोषणा, दिग्गजांच्या डोक्यावर टांगती तलवार
(Photo Credits: IPL)

IPL 2021:  इंडियन प्रीमियर लीग चा 14वी सीजन एप्रिल-मे महिन्यात पार पडणार आहे. परंतु आज आयपीएलच्या पुढील सीजन पूर्वी सर्व खेळाडूंसाठी हा मोठा दिवस असणार आहे. तसेच कोणत्या संघात कोणाला स्थान दिले जाईल या बद्दलच आज निर्णय घेतला जाणार आहे. बीसीसीआयने आपल्या संघातील अंतिम खेळाडूंची नावे जाहीर करण्यासाठी 20 जानेवारी पर्यंत वेळ दिली होती. या संदर्भातच संध्याकाळी 6 वाजता स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर एक शो टेलिकास्ट होणार असून त्यात सर्व संघातील अंतिम खेळाडूंची नावे जाहीर केली जाणार आहेत.

खेळाडूंची नावे जाहीर करण्यापूर्वी जोरदार चर्चा सुरु झाली आहे. याच दरम्यान, राजस्थान रॉयल्स संघाचा कर्णधार स्टीव्ह स्मिथला संघात स्थान मिळणार की नाही याबद्दल बोलले जात आहे. स्मिथ याला संघात ठेवण्यासाठी राजस्थान रॉयल्स कडून त्याला 12.5 कोटी रुपये दिले जातात. त्याच्या नेतृत्वाखाली गेल्या वर्षातील सीजनमध्ये संघाने दमदार कामगिरी केली नव्हती.(BCCI कडून टीम इंडियाला Australia विरूद्धची टेस्ट सीरीज जिंकल्यानंतर 5 कोटीचा बोनस जाहीर करत पाठीवर कौतुकाची थाप)

चेन्नई सुपर किंग्स संघ सुद्धा गेल्या वर्षातील सीजनमध्ये दमदार खेळी करण्यास असमर्थ ठरला. पहिल्यांदाच धोनीच्या नेतृत्वाखालील सीएसके प्लेऑफमध्ये आपले स्थान मिळवण्यास अयशस्वी ठरला. चेन्नईच्या टीम मधून पीयूष चावला आणि मुरली विजय यांना संघात स्थान दिले जाऊ शकत नाही अशी चर्चा आहे. या व्यतिरिक्त केदार जाधव आणि सुरेश रैना यांच्यावर डोक्यावर सुद्धा टांगती तलवार असणार आहे.

तसेच किंग्स इलेव्हन पंजाबच्या टीममध्ये सुद्धा बदल पहायला मिळणार आहे. पंजाबचा संघ करुण नायर याला स्थान देऊ शकतो. ग्लैन मॅक्सवेल संघात रहाणार की नाही यावर संघाच्या मॅनेजमेंटने अद्याप कोणतेही विधान केलेले नाही. असा अंदाज लावला जात आहे की, दिनेश कार्तिक याला केकेआर मध्ये स्थान मिळू शकते. परंतु केकेआर संघाने आधीच स्पष्ट केले आहे की, संघाचा माजी कर्णधार दिनेश कार्तिक याचे स्थान कायम राहणार आहे.(ICC Test Team Rankings: आयसीसी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाची घसरण, टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर)

दरम्यान, आयपीएलच्या 14 व्या सीजनसाठी खेळाडूंचा लिलाव होणार आहे. असे बोलले जात आहे की, आयपीएलच्या मिनी ऑक्शनचे आयोजन येत्या 16 फेब्रुवारीला केले जाऊ शकते. या ऑक्शनमध्ये सहभागी होण्यासाठी खेळाडूंना 4 फेब्रुवारी पर्यंत रजिस्ट्रेशन करावे लागणार आहे. प्राप्त झालेल्या माहितीनुसार, बीसीसीआयने खेळाडूंच्या ऑक्शनमध्ये सहभागी होण्यासाठी नियम अधिक कठोर केले आहेत. जर ऑक्शनमध्ये एखादा खेळाडू व्यक्तिगत रुपात सहभागी होऊ इच्छितो तर त्याने राज्य संघासोबत थेट बातचीच करावी.