BCCI कडून टीम इंडियाला Australia विरूद्धची टेस्ट सीरीज जिंकल्यानंतर  5 कोटीचा बोनस जाहीर  करत पाठीवर कौतुकाची थाप
बीसीसीआय (Photo Credits: IANS)

भारतीय क्रिकेट टीम (Team India) ने ऑस्ट्रेलिया विरूद्ध ब्रिस्बेन टेस्ट (Brisbane Test) आणि सीरीज मध्ये 2-1 असा विजय मिळवत इतिहास रचला आहे. टीम इंडियाच्या या ऐतिहासिक विजयावर बीसीसीआयने (BCCI) देखील आनंद व्यक्त केला आहे. भारतीय क्रिकेट बोर्डचे प्रमुख सौरव गांगुली यांनी टीम इंडियासाठी बक्षीस म्हणून 5 कोटीचा बोनस जाहीर केला आहे. दरम्यान यावेळेस टीम इंडियाचं कौतुक करताना हा आकडा आनंदाच्या पलिकडे जाणारा आहे असे त्यांनी म्हटलं आहे. Team India च्या Australia मध्ये टेस्ट सीरीजमधील ऐतिहासिक कामगिरीनंतर PM Narendra Modi ते Sachin Tendulkar यांच्याकडून कौतुकाचा वर्षाव.

सौरव गांगुली यांनी ट्वीट करत ऑस्ट्रेलिया मध्ये जाऊन अशाप्रकारे टेस्ट सीरीज जिंकणं हा विजय भारतीय क्रिकेट विश्वामध्ये कायम लक्षात राहणारा आहे. असं म्हणताता बीसीसीआय ने टीम इंडियाला पाच कोटी बोनस देत असल्याचा निर्णय जाहीर करत टीम इंडियाच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली आहे. IND vs AUS 4th Test 2021: गब्बा येथे ऑस्ट्रेलियाची विजयी मालिका खंडित, ‘या’ 5 कारणांमुळे टीम इंडियाने मिळवला ऐतिहासिक विजय.

BCCI कडून 5 कोटीचा बोनस

ऑस्ट्रेलिया 1988 ला वेस्ट इंडिज नंतर भारत हा पहिला देश होता ज्याने पराभूत केले आहे. दरम्यान टीम इंडियासाठी ही सीरीज मूळीच सोपी नव्हती. विराट कोहलीच्या अनुपस्थितीमध्ये अजिंक्य रहाणे टीम इंडियाचं नेतृत्त्व करत होता. त्यापाठोपाठ अनेक भारतीय खेळाडू दुखापतींचा सामना करत होते. तर स्टेडियम मध्येही हुल्लडबाज प्रेक्षकांकडून काही खेळाडूंवर वंशद्वेष करणारी टिपण्णी करण्यात आली होती. पण या सार्‍याचा सामना करत टीम इंडियाने अभिमानास्पद कामगिरी केली आहे.