ICC Test Team Rankings: आयसीसी क्रमवारीत ऑस्ट्रेलियाची घसरण, टीम इंडिया दुसऱ्या क्रमांकावर
ICC Test Team Rankings | (Photo Credit: Twitter)

गब्बा येथे झालेल्या भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया (India v Australia) कसोटी क्रिकेट सामन्यांमध्ये टीम इंडियाने (Team India) आज जबरदस्त कामगिरी केली. या कामगिरीमुळे क्रिकेट विश्वात केवळ ऐतिहासिक नोंदच झाली नाही तर त्यासोबतच आयसीसी कसोटी रँकींगमध्ये ( ICC Test Team Rankings) असलेले भारताचे स्थानही वधारले आहे. या क्रमवारीत भारत आता दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. या क्रमवारीत भारताने ऑस्ट्रेलियाला मागे टाकले. आता केवळ न्यूझिलंडच भारताच्या पुढे आहे. न्युझीलंडलाही या क्रमवारीत मागे टाकल्यास भारत जगात 'नंबर वन' ठरणार आहे.

आयसीसी क्रमवारीत 118.44 गुणांच्या जोरावर न्यूझीलंड क्रमांक एकवर आहे. न्यूझीलंडच्या पाठोपाठ ऑस्ट्रेलियाचा क्रमांक होता. परंतू, भारताने दमदार खेळी करत 117.65 गुण मिळवले आणि ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर ढकलला गेला. या क्रमवारीत ऑस्ट्रेलिया 113 गुण मिळवून तिसऱ्या क्रमांकावर आहे. (हेही वाचा, BCCI कडून टीम इंडियाला Australia विरूद्धची टेस्ट सीरीज जिंकल्यानंतर 5 कोटीचा बोनस जाहीर करत पाठीवर कौतुकाची थाप)

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात जालेल्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेत भारताने आज निर्णायक सामना खेळला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियावर विजय मिळवला. गब्बा मैदानावर इतक्या मोठ्या प्रमाणावर भारताने मिळवलेला हा पहिलाच विजय आहे. भारताने हा सामना तीन गडी राखून जिंकला. पण या विजयाला केवळ नेहमीचा विजय इतकेच महत्त्व नाही. या विजयाच्या रुपात भारताने ऑस्ट्रेलियाची धुंदीही उतरवली आहे. या विजयामुळे भारताला आयसीसी टेस्ट क्रमवारीत वरचे स्थान मिळाले आहे.