IPL 2021: ‘अंपायरकडे केली होती मागणी पण...’ PBKS संघाच्या पराभवानंतर KL Rahul ने केली ‘हा’ नियम बदलण्याची मागणी
केएल राहुल (Photo Credit: PTI)

IPL 2021: मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर रविवार, 18 एप्रिल रोजी खेळवण्यात आलेल्या आयपीएल सामन्यात केएल राहुलच्या पंजाब किंग्सना उच्च धावसंख्येचा सामन्यात दिल्ली कॅपिटल्सकडून 6 विकेटने पराभव पत्करावा लागला. शिखर धवनच्या 92 धावांच्या धमाकेदार खेळीच्या जोरावर दिल्लीने पंजाबने दिलेल्या विशाल लक्ष्य सहज गाठले. वानखेडे मैदानावर 51-चेंडूत 61 धावा करणाऱ्या राहुलने दव घटकावर संघाच्या पराभवाचं खापर फोडलं आणि वानखेडे येथे दवघटक घटकाचा चुकीचा अर्थ लावला असून त्यांनी किमान 10-15 धावा कमी पडल्याचं काबुल केलं. राहुलने मयंक अग्रवालसह 122 धावांची भागीदारी करत दिल्ली गोलंदाजांवर हल्ला चढवला, पण नंतर कॅपिटल्स गोलंदाजांनी संघाला सामन्यात कमबॅक करून दिलं. क्रिस गेल आणि निकोलस पूरन यांनाही स्वत: नुसार खेळता आले नाही. (DC vs PBKS IPL 2021 Match 10: पंजाब विरोधात शिखर धवनची बल्ले-बल्ले, दिल्ली कॅपिटल्स 6 विकेटने विजयी)

सामन्यानंतर राहुल म्हणाला की वाढदिवशी विजयाची भेट मिळाली असती तर चांगलं झालं असतं. त्यानंतर वानखेडेवरील दव फॅक्टरवर राहुलने निराशा व्यक्त केली आणि दर दोन ओव्हरमध्ये अंपायर बदलू शकतात असे विधानही त्याने केलं. “माझ्या वाढदिवशी विजय गोड झाला असता. थोडेसे निराशाजनक परंतु आमच्याकडे अद्याप बरेच सामने शिल्लक आहेत. शेवटी पहाल तेव्हा 10-15 धावा कमी पडल्या. पण मला वाटले मधल्या 196 मध्ये फलंदाजी खरोखर चांगली होती. पहिल्या मध्यात मी आणि मयंक बोलत होतो की 180-190 धावा झाल्या तर चांगलं आहे. पण स्पष्टपणे वानखेडे येथे दव फॅक्टर आहेत आणि धवनला श्रेय दिले पाहिजे. आम्ही नेहमीच अशा परिस्थितीसाठी तयारी करण्याचा प्रयत्न करतो परंतु हे कठीण होते,” राहुलने सामन्यानंतरच्या सादरीकरणात सांगितले.

राहुलनेही सायमन डोलच्या सल्ल्याला पाठिंबा दिला आणि म्हणाले की, त्याने अंपायरना ओला असल्याने दोनदा चेंडू बदलण्यास सांगितले. तथापि, त्यासाठी कोणतीही तरतूद नाही. “मला असे वाटते की ते योग्य असेल [प्रत्येक दोन ओव्हर्समध्ये बॉल बदलणे, साइमन डोलचा सल्ला] आणि मी फक्त हरलो म्हणून म्हणत नाही आहे. मी अंपायरना दोन वेळा बॉल बदलण्यास सांगितले, परंतु ते नियमात नाही,” राहुलने पुढे म्हटले.