चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) फ्रँचायझी मालक एन श्रीनिवासन (N Srinivasan) यांनी माजी भारतीय फलंदाज आणि टीमचा अष्टपैलू क्रिकेटर सुरेश रैनाच्या (Suresh Raina) टीममध्ये परतण्यावर स्पष्टीकरण जाहीर केले. श्रीनिवासन म्हणले की रैना त्यांच्या मुलासारखा आहे, पण यंदा इंडियन प्रीमिअर लीगसाठी (Indian Premier League) त्याच्या परतण्यावर ते निर्णय घेऊ शकत नाही. गेल्या आठवड्यात रैनाने राष्ट्रीय संघाचा वेगवान गोलंदाज दीपक चाहरसह 13 कोरोना व्हायरस प्रकरणं आढळल्यानंतर दुबईत सीएसके (CSK) कॅम्प सोडला होता. परंतु बायो-बबलच्या कथित उल्लंघनाबद्दल काही वाद उद्भवू लागले, ज्यास खेळाडूने स्पष्ट नकार दिला. बीसीसीआयचे माजी अध्यक्ष सुरुवातीला रैनाच्या निघून जाण्यावरून संतापले होते परंतु नंतर त्यांनी आपली भूमिका नरम केली. रैनाही श्रीनिवासन यांच्याशी बोलला असल्याचे दिसले आणि त्याने यंदा आयपीएलमध्ये (IPL) परतण्याची शक्यता असल्याचेही सांगितले. (IPL 2020: चेन्नई सुपर किंग्जचा उपकर्णधार कोण? सुरेश रैनाच्या आयपीएल 13 मधून एक्सिटनंतर चाहत्याच्या प्रश्नावर CSK ची Wise प्रतिक्रिया, तुम्ही देखील व्हाल सहमत)
"मी त्याला मुलासारखी वागणूक दिली आहे. फ्रेंचायझीने क्रिकेटच्या बाबतीत कधीही आपले नाक ओढले नाही हे आयपीएलमध्ये वर्षानुवर्षे सीएसकेने मिळवलेल्या यशाचे कारण आहे. इंडिया सिमेंट्स 60 च्या दशकापासून क्रिकेट चालवत आहे. मी सदैव तसेच राहीन," श्रीनिवासन यांनी PTIला सांगितले. युएई येथे आयोजित होणाऱ्या आयपीएलमध्ये रैना खेळेल अशी त्यांना अपेक्षा आहे का? यावर श्रीनिवासन म्हणाले, "हे पहा, कृपया समजून घ्या की ते माझे डोमेन नाही (रैना परत येईल की नाही). आम्ही संघ मालक आहोत, आमच्याकडे फ्रँचायझी आहे पण खेळाडूआमच्या मालकीचे नाहीत. टीम आमची आहे पण खेळाडू नाहीत. मी खेळाडूंचा मालक नाही," माजी आयसीसी आणि बीसीसीआय अध्यक्ष म्हणाले.
दरम्यान, रैनाचा निर्णय टीम मॅनेजमेंट म्हणजे कर्णधार धोनी आणि मुख्य कार्यकारी अधिकारी के एस विश्वनाथन घेऊ शकतात. "मी क्रिकेट कर्णधार नाही. मी त्यांना (टीम मॅनेजमेंट) कधीही सांगितले नाही की कोणाबरोबर खेळायचे, कोणाला लिलावात घ्यायचे, कधी नाही. आमच्याकडे सर्व काळचा महान कर्णधार आहे. तर मग मी क्रिकेटींग बाबीत हस्तक्षेप का करू?" श्रीनिवासन म्हणाले. सीएसके भारतातील या हाय-प्रोफाइल लीगमध्ये तीन वेळा विजेतेपद मिळवले आहेत.