CSK Vice-Captain for IPL 2020: चेन्नई सुपर किंग्जचा उपकर्णधार कोण? सुरेश रैनाच्या आयपीएल 13 मधून एक्सिटनंतर चाहत्याच्या प्रश्नावर CSK ची Wise प्रतिक्रिया, तुम्ही देखील व्हाल सहमत
एमएस धोनी आणि सुरेश रैना (Photo Credit: Instagram)

सुरेश रैनाने (Suresh Raina) 'वैयक्तिक कारणे' असल्याचे सांगून इंडियन प्रीमियर लीगमधून (आयपीएल) माघार घेतली, तरी चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kings) उपकर्णधार कोण असेल असा प्रश्न सध्या सीएसके चाहत्यांना पडला आहे. दुबईतील 6 दिवसांचा अनिवार्य क्वारंटाइन कालावधीनंतर रैना भारतात परतला आणि संपूर्ण क्रिकेटविश्व स्तब्ध झाले. 19 सप्टेंबर ते 10 नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या आयपीएलसाठी (IPL) बुधवारी, सीएसकेच्या (CSK) एका चाहत्याने उपकर्णधार नसल्याने फ्रँचायझीला सोशल मीडियावर प्रश्न विचारला. सीएसके, नेहमीप्रमाणे, हास्यास्पद उत्तर दिले. पण, सीएसकेने दिलेल्या प्रतिक्रियेशी तुम्ही सुद्धा सहमत व्हाल हे मात्र नक्की. रैना आणि चेन्नई सुपर किंग्स हे दोन मुद्दे सध्या चांगल्याच चर्चेत आहेत. चेन्नईच्या खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला करोनाची लागण झाली, त्यानंतर रैनाने आयपीएलमधून 'वैयक्तिक कारण' सांगून माघार घेतली. रैनाने बुधवारी युएईमध्ये परत येण्याची आणि सीएसके कॅम्पमध्ये जाण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे सांगितले. (IPL 2020 Update: सुरेश रैनाने अखेर आयपीएल 13 मधून बाहेर पडण्याचे कारण स्पष्ट केले, 'CSK माझे कुटुंब आहे' म्हणत कमबॅकवर दिला इशारा)

दरम्यान, यूजरच्या प्रश्नावर, "आपल्याकडे 'शहाणा कॅप्टन' असताना भीती का आहे?" अशी प्रतिक्रिया देताना सीएसकेने सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले.

दुसरीकडे, रैनाने आयपीएलमधून माघार घेण्यामागे धोनी आणि त्याच्यातील वाद कारणीभूत असल्याचं सीएसकेचे मालक एन श्रीनिवासन यांनी सांगितलं. या मुद्द्यावर रैनानेच मौन सोडलं आणि आपला निर्णय स्पष्ट करत सर्व अफवा फेटाळून लावल्या. धोनी आणि सुपर किंग्ज संघ-व्यवस्थापन यांच्यात सर्व काही ठीक आहे हे स्पष्ट करत त्याने वैयक्तिक कारणास्तव आणि आपल्या कुटूंबासमवेत राहण्यासाठी भारतात परतल्याचे सांगितले. Cricbuzzला दिलेल्या मुलाखतीत रैना म्हणाला, “हा वैयक्तिक निर्णय होता आणि मला माझ्या कुटुंबासाठी परत यावे लागले. होम फ्रंटवर असे काहीतरी होते ज्यावर तत्काळ लक्ष देण्याची गरज होती. सीएसके माझं कुटुंबही आहे आणि माही भाई माझ्यासाठी खूप महत्त्वाचे आहेत आणि हा एक कठोर निर्णय होता. सीएसके आणि माझ्यात कोणताही वाद नाही.” रैना पुढे म्हणाला की आपल्या कुटुंबाविषयी भीतीशिवाय, पंजाबच्या पठाणकोट त्याच्या नातेवाईकांवर दरोडेखोरांचा हल्ला आणि काकांच्या हत्येने देखील त्याच्या अचानक परतण्याच्या निर्णयामध्ये भूमिका बजावली.