आयपीएलच्या (IPL) 13 व्या हंगामातून चेन्नई सुपर किंग्जचा (Chennai Super Kinsg) अष्टपैलू खेळाडू सुरेश रैनाने (Suresh Raina) माघार घेतली आणि खासगी कारणास्तव भारतात परतला. रैनाच्या या एकाएकी निर्णयामुळे क्रिकेटविश्वात आश्चर्य व्यक्त केलं जातं होतं. शिवाय, सीएसके (CSK) फ्रँचायझी मालक आणि माजी बीसीसीआय अध्यक्ष एन श्रीनिवासन (N Srinivasan) देखील रैनावर नाराज असल्याचं समोर आलं होतं. Outlook ला दिलेल्या मुलाखतीती श्रीनिवासन यांनी रैनाच्या माघार घेण्याच्या निर्णयावर नाराजी व्यक्ती केली होती. Outlookच्या अहवालानुसार रैनाच्या जाण्यामागे हॉटेल रूम हे कारण असू शकते. 20 ऑगस्ट रोजी पंजाबच्या पठाणकोट गावात दरोडेखोरांनी आपल्या नातेवाईकाची हत्या केल्याने, तर PTI ने शुक्रवारी सांगितले की कोविड-19 च्या धोक्याने त्याला घरी परत जाण्यास उद्युक्त केले. श्रीनिवासन यांनी रैनाला “प्राइमा डोना” म्हटले. "क्रिकेटर्स हे प्राइमा डोनासारखे असतात ... जुन्या काळातील स्वभाववादी कलाकारांसारखे. चेन्नई सुपर किंग्ज हा नेहमीच कुटूंबासारखा राहिला आहे आणि सर्व ज्येष्ठ खेळाडूंनी सह अस्तित्व राहणे शिकले आहे," श्रीनिवास म्हणाले. (IPL 2020 Update: सुरेश रैनासाठी चेन्नई सुपर किंग्सचे दार बंद? 13व्या सत्रातून एकाएकी माघार घेतल्याने रैना 2021 च्या लिलावात उतरण्याची शक्यता)
मात्र आता श्रीनिवासन यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत आपल्या वक्तव्याचा विपर्यास केला गेल्याचं सांगितलं. सीएसके बॉस श्रीनिवासन म्हणाले, “सुरेश रैनाचं चेन्नई सुपर किंग्ससाठीचं योगदान महत्वाचं आहे. माझ्या वक्तव्यातून लोकं दुसरा अर्थ काढत आहेत हे दुर्दैवी आहे. रैना सध्या कोणत्या परिस्थितीतून जात आहे हे आपल्या सर्वांना समजायला हवं आणि त्याला सध्या मोकळीक देणं गरजेचं आहे. संघ म्हणून आमचा रैनाला नेहमी पाठींबा आहे, खडतर काळात आम्ही त्याच्या पाठीशी आहोत.” 2008 मध्ये आयपीएलच्या उद्घाटन सीजनमध्ये रैनाची निवड केल्यापासून त्याने प्रत्येक वेळी सीएसकेसाठी महत्वपूर्ण भूमिका बजावली आहे आणि स्वतःसाठी 'चिन्ना थाला' म्हणून ओळख निर्माण केली.
युएईला जाण्यापूर्वी रैनाने टीमसह चेन्नई येथे एका आठवड्याभराच्या प्रशिक्षण शिबिरामध्ये भाग घेतला होता, आणि आयपीएल खेळण्यासाठी युएईमध्ये जाण्याबद्दल खूप उत्साही होता त्यामुळे त्याच्या निर्णयाने त्याच्या चाहत्यांना आश्चर्यचकित केले. अलीकडेच चेन्नई सुपर किंग्जमधील दोन खेळाडूंसह 13 सदस्यांना कोरोनाची लागण झाल्यानंतर संपूर्ण टीम क्वारंटाइन झाली आहे, आणि संघाचे सराव सत्र 1 सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आले आहे.