इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलियन (Australia) खेळाडूंना यंदा इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) पहिल्या आढवड्याला मुकावे लागणार हे नक्की झाले आहे. आयपीएलच्या फ्रँचायझींना (IPL Franchises) इंग्लंड व ऑस्ट्रेलियाच्या स्टार क्रिकेटरविना पहिले 1-2 गेम सामने लागतीलमी मग तो बेन स्टोक्स, स्टिव्ह स्मिथ (Steve Smith) असो किंवा इयन मॉर्गन (Eoin Morgan) सर्व फ्रँचायझींना दोन्ही संघांच्या 16 सप्टेंबर रोजी संपणार्या 3 टी-20 आणि 3 वनडे सामन्यांच्या मालिकेत 17-18 आघाडीच्या क्रिकेटर्सविना खेळावे लागणार आहे. ऑस्ट्रेलियन संघ (Australian Team) सप्टेंबरमध्ये इंग्लंडचा दौरा करणार असल्याची पुष्टी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने केली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (England Cricket Board) ऑस्ट्रेलियाचा संघ सप्टेंबरमध्ये 3 वनडे आणि टी 20 मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा (Australia Tour of England) करणार असल्याचं जाहीर केलं. मालिकेची सुरुवात 4 सप्टेंबर रोजी टी-20 मालिकेने होईल आणि मालिकेचा अखेरचा सामना 16 सप्टेंबर रोजी खेळला जाईल. यामुळे सर्व फ्रॅन्चायझींची डोकेदुखी वाढी आहे. (Australia Tour of England 2020: सप्टेंबर महिन्यात होणार इंग्लंड-ऑस्ट्रेलिया वनडे आणि टी-20 मालिका; ऑस्ट्रेलियाच्या 21 सदस्यीय संघाची घोषणा, जाणून घ्या पूर्ण शेड्युल)
कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्व संघ एक महिनापूर्वी युएई येथे दाखल होणार आहे. मागील वर्षी डिसेंबर महिन्यात झालेल्या आयपीएलच्या लिलावात ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड सर्वाधिक कोटी रुपयात फ्रॅन्चायझींनी खरेदी केले होते. हाय-प्रोफाइल मालिकेत भाग घेत असलेले आघाडीचे क्रिकेटपटू 16 सप्टेंबर पूर्वी निघू शकणार नाही आणि बीसीसीआयच्या सेट केलेले कोविड-19 प्रोटोकॉलमुळे ते आयपीएलच्या पहिल्या आठवड्यात खेळू शकणार नाही. आयपीएलच्या प्रोटोकॉलनुसार ठरवलेल्या बायो-बबलमध्ये प्रवेश करणाऱ्या प्रत्येक सदस्याला आधी सात दिवस क्वारंटाइन राहावे लागेल, ज्यामध्ये संघातील सदस्यांनी प्रशिक्षण सुरू करण्यापूर्वी तीन टेस्ट पास केल्या पाहिजेत. एवढेच नव्हे तर युएईला पोहोचल्यानंतर स्थानिक सरकारच्या निर्देशानुसार त्यांना कोविड-19 टेस्ट करावी लागेल, जी नकारात्मक आल्यावरच खेळाडूंना युएई सरकारच्या क्वारंटाइन विभागातून बाहेर जाण्याची परवानगी दिली जाईल.
दरम्यान, पाहा इंग्लंड-ऑस्ट्रेलिया मालिकेचा कोणत्या टीमला किती फटका बसला:
चेन्नई सुपर किंग्स: सॅम कुर्रान, जोश हेजलवुड
दिल्ली कॅपिटल्स: अॅलेक्स कॅरी, जेसन रॉय, मार्कस स्टोनिस
कोलकाता नाइट रायडर्स: पॅट कमिन्स, बेन ग्रीन, हॅरी गुर्नी, इऑन मॉर्गन, टॉम बंटन
किंग्ज इलेव्हन पंजाब: क्रिस जॉर्डन, ग्लेन मॅक्सवेल
सनरायझर्स हैदराबाद: जॉनी बेअरस्टो, मिशेल मार्श, बिली स्टेनलेक, डेविड वॉर्नर
राजस्थान रॉयल्स: जोफ्रा आर्चर, जोस बटलर, टॉम कुर्रान, स्टीव्ह स्मिथ, बेन स्टोक्स, अँड्र्यू टाय
रॉयल चॅलेंजर्स बेंगलुरू: मोईन अली, आरोन फिंच, जोश फिलिपे, केन रिचर्डसन
मुंबई इंडियन्स: नॅथन कोल्टर-नाईल, क्रिस लिन