इंग्लंड आणि वेस्ट इंडीज यांच्यात झालेल्या कसोटी मालिकेद्वारे कोरोना व्हायरस काळात आंतरराष्ट्रीय क्रिकेट पुन्हा सुरू झाले. यानंतर आयर्लंडने तीन वनडे सामन्यांच्या मालिकेत इंग्लंडचा सामना केला. त्यानंतर आता पाकिस्तान आणि इंग्लंड यांच्यात कसोटी मालिका खेळली जात असून त्यानंतर दोन्ही देशांमध्ये 3 सामन्यांची टी-20 मालिका खेळली जाईल. या दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघ सप्टेंबरमध्ये इंग्लंडचा दौरा करणार असल्याची पुष्टी इंग्लंड क्रिकेट बोर्डाने केली आहे. इंग्लंड क्रिकेट बोर्डाने (England Cricket Board) ऑस्ट्रेलियाचा संघ सप्टेंबरमध्ये 3 वनडे आणि टी 20 मालिकेसाठी इंग्लंडचा दौरा (Australia Tour of England) करणार असल्याचं जाहीर केलं. ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिकेचे वेळापत्रकही ईसीबीने जाहीर केले आहे, तर या दौऱ्यासाठी ऑस्ट्रेलियाच्या 21 सदस्यीय संघाची घोषणाही करण्यात आली आहे. इंग्लंड (England) आणि ऑस्ट्रेलिया (Australia) यांच्यातील तीन सामन्यांची टी-20 मालिका साऊथॅम्प्टनच्या (Southampton) एजस बाऊल येथे तर वनडे मालिका मॅचचेस्टरच्या (Manchester) ओल्ड ट्रॅफर्ड येथे होईल. (India Tour of Australia 2020-21: भारत-ऑस्ट्रेलिया बॉक्सिंग डे टेस्ट मेलबर्न येथे आयोजित करण्यासाठी CA प्रयत्नशील)
इंग्लंड क्रिकेट बोर्ड या दोन स्टेडियममध्ये मालिका खेळत आहे कारण येथे जवळपास हॉटेल्स आहेत आणि कोरोनाचा धोका लक्षात घेता बायो-सुरक्षित बबलमध्ये कोणतीही समस्या नाही. इंग्लंडचा ग्रीष्म ऋतू ऑस्ट्रेलियाविरूद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेसह संपेल आणि त्यानंतर इंडियन प्रीमियर लीगसारख्या स्पर्धा खेळण्यास खेळाडू मोकळे होतील याची पुष्टीही ईसीबीने केली. इंग्लंड क्रिकेट बोर्डाच्या म्हणण्यानुसार, ऑस्ट्रेलियन संघ 24 ऑगस्ट रोजी इंग्लंड पोहोचेल आणि डर्बी येथे थांबेल. ऑस्ट्रेलिया टीम 5 दिवस क्वारंटाइन होईल, त्यानंतर इंट्रा पथक वनडे सामना आणि टी-20 सामन्यांसाठी सराव करेल. टी -20 मालिका साऊथॅम्प्टनमध्ये 4 सप्टेंबरपासून सुरू होईल.
T20Is ⮕ 4-8 September
ODIs ⮕ 11-16 September
Details 👇 https://t.co/vhoOoSFHsH#ENGvAUS
— ICC (@ICC) August 14, 2020
इंग्लंड-ऑस्ट्रेलिया टी-20 मालिका वेळापत्रक
पहला टी-20 - 4 सप्टेंबर, साउथॅम्प्टन
दूसरा टी-20- 6 सप्टेंबर, साउथॅम्प्टन
तीसरा टी20- 8 सप्टेंबर, साउथॅम्प्टन
इंग्लंड-ऑस्ट्रेलिया वनडे मालिका वेळापत्रक
पहली वनडे- 11 सप्टेंबर, मॅन्चेस्टर
दूसरी वनडे- 13 सप्टेंबर, मॅन्चेस्टर
तीसरी वनडे- 16 सप्टेंबर, मॅन्चेस्टर
टी -20 आणि वनडे सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघ
आरोन फिंच (कॅप्टन), सीन अॅबॉट, अॅश्टन अगर, अॅलेक्स कॅरी, पॅट कमिन्स, जोश हेजलवुड, मार्नस लाबूशेन, नॅथन लायन, मिशेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, रिले मेरीडिथ, जोश फिलिप, डॅनियल सॅम, केन रिचर्डसन, स्टिव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टोइनिस, अँड्र्यू टाय, मॅथ्यू वेड, डेविड वॉर्नर आणि अॅडम झांपा.