आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: IANS)

संयुक्त अरब अमिरातीने (United Arab Emirates) आयपीएल 2020 आयोजनासाठी आणखी एक पाऊल पुढे टाकले आहे. बीसीसीआयने रविवारी अमिरात क्रिकेट बोर्डाला (Emirates Cricket Board) एक स्वीकृती पत्र पाठवले. इंडियन प्रीमिअर लीगचे (Indian Premier League) अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी खलिज टाईम्सला या माहितीची पुष्टी केली. कोविड-19 ने जगाला हादरवून दिल्यानंतर यंदा युएई (UAE) आयपीएल (IPL) आयोजित करण्यासाठी प्रबळ दावेदार बनला. मार्च 29 पासून सुरु होणारे आयपीएल यंदा सप्टेंबर 19 रोजी सुरु होईल. बीसीसीआयच्या या कारवाईनंतर आता संपूर्ण क्रिकेट विश्वाचे लक्ष भारत सरकारच्या (Indian Government) निर्णयाकडे लागून आहे. यंदा लीग भारताबाहेर आयोजित करण्याचे ठरले असले तरी अंतिम निर्णय गृहमंत्रालय देईल. दुसरीकडे, मंत्रायलकडून याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही. “आम्ही एमिरेट्स क्रिकेट बोर्डाला स्वीकृतीपत्र पाठवले आहे आणि दोन्ही मंडळे आतापासून या स्पर्धेसाठी एकत्र काम करणार आहेत,” पटेल म्हणाले. स्पर्धेच्या तयारीसाठी संघांना कमीतकमी तीन ते चार आठवड्यांचा कालावधी लागतो. (IPL 2020 Dates Announced: आयपीएलची तारीख निश्चित! अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांची मोठी घोषणा, 19 सप्टेंबर रोजी पहिला सामना तर 8 नोव्हेंबरला होणार फायनल)

दरम्यान, ईसीबीचे मुबाशीर उस्मानी म्हणाले की सोमवारी मंडळाकडून औपचारिक घोषणा केली जाईल. "आम्ही (ईसीबी) सोमवारी या विषयावर एक प्रसिध्दीपत्रक पाठवणार आहोत, पण याक्षणी मी त्यापेक्षा जास्त सांगू शकत नाही," उस्मानी यांनी खलीज टाईम्सला सांगितले. यापूर्वी न्यूझीलंड क्रिकेटने केन विल्यमसन (सनरायझर्स हैदराबाद), ट्रेंट बाउल्ट (मुंबई इंडियन्स), जिमी नीशम (किंग्ज इलेव्हन पंजाब), मिचेल सँटनर (चेन्नई सुपर किंग्ज), मिशेल मॅकक्लेनाघन (मुंबई इंडियन्स) आणि लकी फर्ग्युसन (कोलकाता नाइट रायडर्स)या सहा खेळाडूंना एनओसी जारी केली होती.

क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडूनही अशीच अपेक्षा आहे. ऑस्ट्रेलियाच्या 15 खेळाडूंशी सध्या आयपीएल फ्रँचायझींनी करार केला आहे. यामध्ये आरोन फिंच, जोश फिलिप, केन रिचर्डसन, क्रिस लिन, नाथन कल्टर-नील, जोश हेजलवुड, शेन वॉटसन, अ‍ॅलेक्स कॅरी, मार्कस स्टॉयनिस, ग्लेन मॅक्सवेल, पॅट कमिन्स, क्रिस ग्रीन, स्टीव्ह स्मिथ, डेविड वॉर्नर आणि अँड्र्यू टाय यांचा समावेश आहे.