IPL 2020: CSKविरुद्ध लढाईपूर्वी मुंबई इंडियन्स कर्णधार रोहित शर्माने दिले 'बॅलेन्स द बॅट चॅलेंज', पाहा Video
रोहित शर्मा 'बॅलेन्स द बॅट चॅलेंज' (Photo Credit: Twitter)

इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 13व्या हंगामातील 41वा सामना चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) आणि मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) यांच्यात होईल. शारजाह क्रिकेट स्टेडियमवर थोड्याच वेळात हा सामना सुरु होईल. आजच्या सामना जिंकून मुंबई इंडियन्स गुणतालिकेत अव्वल स्थान गाठण्याच्या निर्धारित असतील, तर सीएसकेला आजच्या सामन्यातील पराभव महागात पडू शकतो. आयपीएलमधील या दोन कट्टर प्रतिस्पर्धी टीममध्ये होणाऱ्या सामन्यापूर्वी मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माच्या (Rohit Sharma) 'बॅलेन्स द बॅट चॅलेंज'ने सर्वांचे लक्ष वेधले आहे. रोहित शर्माने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो बॅटवर बोट फिरवताना दिसत आहे. या दरम्यान रोहितही गोल-गोल फिरतही आहे. मुंबई इंडियन्सच्या कर्णधाराने याला 'बॅलन्स द बॅट चॅलेंज' असे नाव दिले आहे आणि या चॅलेंजसाठी त्याने अभिषेक नायर आणि विक्रम साठे यांना नॉमिनेट केले आहे. (CSK vs MI, IPL 2020 Live Streaming: चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यातील आयपीएल लाईव्ह सामना आणि स्कोर पाहा Hotstar आणि Star Network वर)

रोहितने ट्विटरवर व्हिडिओ शेअर करताना म्हटले, "मी माझा वेळ आणि फील्ड दरम्यान योग्य संतुलन साधण्यात व्यस्त आहे. आपल्यासाठी येथे काहीतरी आहे बॅल बॅट चॅलेंज पाहा...आपण माझ्यावर मैदानात मात करू शकत नाही तर काय झालं? येथे प्रयत्न करा!" रोहितची टीम प्ले ऑफची स्थिती निश्चित करण्याच्या जवळ आहे, तर चेन्नई सुपर किंग्ज आतापर्यंतचा खराब हंगाम संपुष्टात करू इच्छित असतील, आणि यासाठी त्यांना आगामी सर्व सामन्यात विजय मिळवणे आवश्यक आहे. पाहा 'हिटमॅन'चा व्हिडिओ:

दरम्यान, सलामीचा सामना गमावल्यानंतर मुंबईने स्पर्धा चांगलीच गाजवली. एमआयने हंगामात 9 सामने खेळले असून 6 विजय मिळवले आहे आणि 3 सामने गमावले आहेत. दुसरीकडे, चेन्नईने चांगली सुरुवात केली होती, परंतु त्यानंतर त्यांची गाडी रुळावरून घसरली. चेन्नईने फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण या तिन्ही विभागात खराब कामगिरी केली आहे. दिग्गज खेळाडू सुरेश रैना आणि हरभजन सिंह यांची उणीव इतर खेळाडू भरून अपयशी ठरले. आता अनुभवी अष्टपैलू ड्वेन ब्रावोनेही दुखापतीमुळे स्पर्धेतून माघार घेतली आहे अशा स्थितीत सीएसकेच्या अडचणीत अजून वाढ झाली आहे. मात्र, हे सर्व मागे टाकून तीन वेळा आयपीएल विजेते विजयाच्या हेतूने मैदानावर उतरतील.