ड्रीम11 नवीन जाहिरात मोहीम (Photo Credits: YouTube)

शनिवारपासून युएईमध्ये आयपीएल (IPL) 2020 सुरू होत आहे. लीगचा पहिला सामना गतवर्षीचे चॅम्पियन मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि उपविजेते चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) यांच्यात खेळला जाईल. यावेळी विवोने इंडियन प्रीमिअर लीगमधून (Indian Premier League) टायटल स्पॉन्सर म्हणून माघार घेतल्यानंतर ड्रीम11 च्या रूपात स्पर्धेला नवीन प्रायोजक मिळाला. जगभरातील प्रसिद्ध टी-20 लीगमध्ये सामील झाल्यानंतर ड्रीम11 ने भारतीय खेळाडूंबरोबर पहिली जाहिरात प्रसिद्ध केली आहे. ड्रीम11 (Dream11) ने 'ये अपना गेम है' अशी जाहिरात प्रसिद्ध केली. या जाहिरातीत सीएसके कर्णधार एमएस धोनी (MS Dhoni), मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), शिखर धवन, जसप्रीत बुमराह, हार्दिक पांड्या, रिषभ पंत मैदानाऐवजी गली क्रिकेट खेळताना दिसत आहेत. व्यावसायिक स्तरावरील कठोर नियमांप्रमाणेच गल्ली क्रिकेटमधील नियम परिस्थितीच्या आधारे तयार केले जातात आणि ही जाहिरात मोहिम तेच दर्शवते. (IPL 2020 Update: बीसीसीआय बॉस सौरव गांगुली यांनी शारजाह क्रिकेट स्टेडियमचा केला दौरा, आयपीएल 13 पूर्वी तयारीचा घेतला आढावा (See Pics))

मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित एका अनोख्या पद्धतीने संघात निवडताना दिसतोय तर त्याचा सहकारी हार्दिक एका हातात मोबाइल फोन पकडून गोलंदाजी करत आहे. चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्र सिंह धोनीने एका फलंदाजाला विचित्रपणे बाद केले, तर पंतची विकेटकिपिंग करण्याची स्थिती अगदी मनोरंजक आहे. या जाहिरातीद्वारे, त्या क्षणांची आठवण केली जी रस्त्यावर क्रिकेट खेळताना काहींनी अनुभवले आहेत. येथे खुर्चीची विकेट, बाहेर रस्त्यावर बसलेल्या लोकांचा त्रास, गटारातून चेंडू बाहेर काढणे आणि फसवणूक किंवा दंडसारख्या स्ट्रीट क्रिकेटच्या खास थराराचा या अ‍ॅडमध्ये समाविष्ट केला गेला आहे.

19 सप्टेंबर रोजी मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स दरम्यान अबू धाबी येथील शेख झायेद स्टेडियममध्ये स्पर्धेच्या सलामीचा सामना खेळला जाईल. कोविडच्या पार्श्वभूमीवर सामने प्रेक्षकांविना खेळले जातील. तथापि, करमणुकीची अद्याप हमी पूर्ण असेल. ड्रीम11 ने तब्बल 222 कोटींमध्ये यंदाच्या आयपीएलची टायटल स्पॉन्सरशिप मिळवली. ड्रीम11 ऐवजी अनअकॅडमीने 210 कोटी, टाटा सन्सने 180 कोटी आणि बायजूने 125 कोटींची बोली लगावली.