भारताचे माजी कर्णधार आणि विद्यमान बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) शारजाह (Sharjah) येथे परतले. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) अध्यक्ष म्हणून गांगुली यांनी इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier League) 20 च्या तयारीचा आढावा घेतला. या ग्राउंडसोबत गांगुलीच्या अनेक आठवणी जोडलेल्या आहेत. शारजाह क्रिकेट मैदानावर (Sharjah Cricket Stadium) खेळल्या अनेक अविस्मरणीय वनडे सामन्यांमध्ये गांगुलीचा सहभाग राहिला ज्यामध्ये माजी कर्णधाराने 700 पेक्षा अधिक धावा केल्या, ज्या एक शतक आणि 5 अर्धशतकांचा समावेश आहे. आयपीएल (IPL) 2020 मध्ये शारजाह स्टेडियम हे 3 ठिकाणांपैकी एक आहे. गांगुली यांच्यासमवेत आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल (Brijesh Patel) आणि सीईओ हेमंग अमीन हे होते. या तिघांनी आयपीएल 2020 च्या तयारीचा आढावा घेतला. गांगुलीने शारजाह येथील आयकॉनिक स्टेडियमला भेट दिली तेव्हाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले. (IPL 2020: अर्जुन तेंडुलकर ला यंदाच्या आयपीएल हंगामात मुंबई इंडियन्स संघात स्थान? जाणून घ्या एका फोटोमुळे सुरू झालेल्या तर्क-वितर्कांमागील सत्य!)
आयपीएल आयोजित ठिकाणांपैकी गांगुलीने सर्वप्रथम शारजाह स्टेडियम येथील तयारीचा आढावा घेतला आणि दुबई व अबू धाबी येथील तयारीचेही ते मूल्यांकन करतील, असे गल्फ न्यूजने म्हटले. बीसीसीआय अध्यक्ष 9 सप्टेंबर रोजी दुबईला दाखल झाले होते आणि शारजाहला जाण्यापूर्वी त्यांचा 6 दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण केला. शारजाह क्रिकेट स्टेडियमने त्यांच्या ट्विटर अकाउंटवर गांगुलीच्या भेटीचे फोटो शेअर केले.
शारजाह क्रिकेट स्टेडियम
Warm Welcome to the Home of Cricket in UAE Sourav Ganguly, BCCI President. IPL Chairman Brijesh Patel, Ex IPL Chairman Rajeev Shukla hosted by Waleed Bukhatir, Vice Chairman of Sharjah Cricket Stadium and Khalaf Bukhatir, MD of Bukhatir Group and CEO of Sharjah Cricket Stadium. pic.twitter.com/xV3y6kG3ji
— Sharjah Cricket Stadium (@sharjahstadium) September 14, 2020
आयपीएल 2020 दरम्यान शारजाह क्रिकेट स्टेडियम 12 सामने आयोजित केले जातील. 22 सप्टेंबर रोजी ऐतिहासिक मैदानावर पहिल्या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स आमने-सामने येतील. 4 ऑक्टोबर रोजी या स्टेडियमवर मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद दरम्यान (डबल हेडर) दुपारी सामना आयोजित केला जाईल. शारजाह स्टेडियममध्ये नुकतेच नूतनीकरण करण्यात आले, ज्यात कोविड-19 संबंधित प्रोटोकॉलचे पालन करण्यासाठी नवीन कॅनोपी स्थापित करणे, अपग्रेड केलेले रॉयल सूट, कमेंट्री बॉक्स आणि व्हीआयपी हॉस्पिटॅलिटी बॉक्स समाविष्ट आहेत. शारजाह स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर आणि सुनील गावस्कर यांनी काही अविस्मरणीय डाव खेळले आहेत.