MI vs DC, IPL 2020 Final: 'गब्बर' मुंबईविरुद्ध पुन्हा अपयशी, शिखर धवनने 15 धावांवर बाद होताच गमावली ऑरेंज कॅप पटकावण्याची संधी  
शिखर धवन (Photo Credit: PTI)

मुंबई इंडियन्सविरुद्ध (Mumbai Indians) इंडियन प्रीमियर लीग (Indian Premeir League) 2020 किताबी लढाईत दिल्ली कॅपिटल्सने (Delhi Capitals) टॉस जिंकून पहिले फलंदाजी केली. दिल्लीचा धडाकेबाज सलामीवीर शिखर धवन (Shikhar Dhawan) मुंबई इंडियन्सविरुद्ध पुन्हा एकदा अपयशी ठरला. टॉस जिंकून पहिले फलंदाजी करणाऱ्या दिल्लीची सलग दुसऱ्यांदा खराब सुरुवात झाली. मुंबईविरुद्ध आयपीएल फायनल (IPL Final) सामन्यात धवनकडून मोठ्या डावाची अपेक्षा होती, पण दिल्लीचा फलंदाज स्वस्तात माघारी परतला. मुंबईने राहुल चाहरच्या जागी संघात स्थान दिलेल्या जयंत यादवने (Jayant Yadav) धवनला आपल्या फिरकीच्या जाळ्यात अडकवले आणि 15 धावांवर असताना फलंदाजांचा त्रिफळा उडवला. अशाप्रकारे धवनने आयपीएलमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाला देण्यात येणारी ऑरेंज कॅप (IPL Orange Cap) पटकावण्याची अंतिम संधीही गमावली. धवनने 17 सामन्यात 618 धावा केल्या आणि टॉप-5 फलंदाजांच्या यादीत दुसरे स्थान मिळवले. यंदाच्या हंगामात किंग्स इलेव्हन पंजाबच्या केएल राहुलने 14 सामन्यात सर्वाधिक 670 धावा केल्या असून तो सध्या ऑरेंज कॅपचा मानकरी आहे. (MI vs DC, IPL 2020 Final: श्रेयस अय्यरने जिंकला टॉस, दिल्ली कॅपिटल्स करणार पहिले फलंदाजी; फायनलसाठी असा आहे दोन्ही संघांचा Playing XI)

आजच्या सामन्यापूर्वी धवनला अव्वल स्थान गाठण्यासाठी 68 धावांची गरज होती, पण तो केलेलं 15 धावाच करू शकला. दरम्यान, धवनने आयपीएलमध्ये पहिल्यांदा 600 धावांचा टप्पा गाठला आहे. विशेष म्हणजे धवनने यावर्षीही दोन डावात सलग दोन शतकं ठोकली आहेत. त्याने चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध 101 धावांची खेळी केली आणि त्यानंतर किंग्ज इलेव्हन पंजाबविरुद्ध नाबाद 106 धावा केल्या. आयपीएलमध्ये धवनने 600 हुन अधिक धावा करण्याची ही पहिलीच वेळ आहे. त्याने 2012 आयपीएलमध्ये 569 धावा केल्या होत्या तर गेल्या वर्षी 521 धावा केल्या होत्या, तर 2016 मध्येही त्याने 501 धावा केल्या होत्या.

दरम्यान, पंजाबचा कर्णधार राहुलने आयपीएलमध्ये यंदा सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत अव्वल स्थान पटकावले. यासह राहुलने पहिल्यांदा आयपीएलच्या 'ऑरेंज कॅप'वर आपले नाव कोरले. इंडियन प्रीमियर लीगमध्ये ऑरेंज कॅप पटकावणारा दिल्लीचा पहिला फलंदाज ठरला तर एकूण तिसरा भारतीय आहे. धवनपूर्वी मुंबई इंडियन्सचा माजी कर्णधार रोहित शर्मा आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली यांनी ही कामगिरी केली आहे. आणि आता धवन या यादीत फक्त तिसरा भारतीय ठरला आहे.