IPL 2020: ‘शाहरुख भाई, तुमचा सर्वात मोठा फॅन.’ जेव्हा KKRच्या दिनेश कार्तिकने राहुल त्रिपाठीची किंग खानशी करून दिली ओळख (Watch Video)
राहुल त्रिपाठी आणि शाहरुख खान (Photo Credit: PTI)

आयपीएलने (IPL) बर्‍याच वर्षांमध्ये अनेक तरुणांची स्वप्ने सत्यात उतरवली आहेत. नवोदित क्रिकेटपटूंनी मैदानात आणि बाहेर मोठ्या गोष्टी साध्य केले आहेत. सुरुवातीपासून जगातील प्रसिद्ध टी-20 लीग बॉलीवूडशी जोडलेले आहे. भारतीय चित्रपटसृष्टी आणि भारतीय क्रिकेट एकमेकांना अपरिचित नाहीत पण आयपीएलप्रमाणे या दोन्ही घटकांना एकत्रित कोणीही आणू शकलेले नाही. चेन्नई सुपर किंग्जविरूद्ध बुधवारी कोलकाता नाईट रायडर्सकडून (Kolkata Knight Riders) मॅच-विनिंग डाव खेळणाऱ्या राहुल त्रिपाठीचे (Rahul Tripathi) बॉलीवूडच्या प्रसिद्ध स्टारशी मिळण्याचे स्वप्न साकार झाले. फलंदाजीद्वारे त्रिपाठीच्या प्रयत्नांचे केवळ माजी आणि सद्य क्रिकेटपटूच नव्हे तर स्वत: किंग खाननेही कौतुक केले. केकेआरचा सह-मालक शाहरुख खान (Shah Rukh Khan) त्याच्या सर्वात मोठ्या चाहत्यांपैकी एक त्रिपाठीचा डाव कधीही विसरणार नाही. केकेआरने सामन्यानंतर एक व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला ज्यात टीमचा कर्णधार दिनेश कार्तिक (Dinesh Karthik) स्टॅन्डमध्ये असलेल्या शाहरुखची राहुलसोबत ओळख करून देत आहे. (IPL 2020: CSKविरुद्ध इयन मॉर्गनपुढे सुनील नारायणला पाठवण्याच्या KKRच्या रणनीतीवर बेन स्टोक्सने उपस्थित केली शंका, पाहा युवराज सिंहची मजेदार कमेंट)

केकेआरने एक शॉर्ट क्लिप पोस्ट केली, जिथे दिनेश साइड स्क्रीनच्या बाजूने जात असल्याचे दिसते, जेव्हा त्रिपाठी मागून आले आणि त्याने कर्णधारला पाठीवर थाप दिली. त्यानंतर कार्तिकने त्रिपाठीच्या खांद्यावर हात ठेवला आणि शाहरुखला त्याची “सर्वात मोठा फॅन” म्हणून ओळख करून दिली. मागील सामन्यात खालच्या फळीतील फलंदाज म्हणून वापरल्या जाणार्‍या राहुलला संघ व्यवस्थापनाने सुनील नारायणच्या जागी सलामीला पाठवले आणि फलंदाजाने देखील निराश केले नाही. राहुलने मिळालेल्या संधीच सोनं करत विजयी खेळी केली. पाहा शाहरुख आणि राहुलच्या भेटीचा हा व्हिडिओ: 

त्रिपाठीने 51 चेंडूत 8 चौकार आणि 3 षटकारांच्या सहाय्याने 81 धावा केल्या. या खेळीसाठी राहुलला त्याच्या मॅच-विनिंग खेळीची सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला. सामनावीराचा पुरस्कार स्वीकारत असताना केकेआरचा सहमालक शाहरुखनेही राहुलच्या खेळीचं कौतुक करत स्टेडीयममधून "राहुल, नाम तो सुना होगा", हा आपला प्रसिद्ध डायलॉग बोलून दाखवला. राहुलने टीमच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. राहुल वगळता अन्य कोणताही फलंदाज मोठी खेळी करू शकला नाही आणि संपूर्ण संघ 167 धावांवर बाद झाला. प्रत्युत्तरात सीएसकेची चांगली सुरुवात झाली असली तरी त्यांना पुढे याचा फायदा होऊ शकला नाही. सीएसकेला विजयासाठी फक्त 10 धावा कमी पडल्या आणि त्यांना चौथ्या पराभवाला सामोरे जावे लागले.