IPL 2020: CSKविरुद्ध इयन मॉर्गनपुढे सुनील नारायणला पाठवण्याच्या KKRच्या रणनीतीवर बेन स्टोक्सने उपस्थित केली शंका, पाहा युवराज सिंहची मजेदार कमेंट
बेन स्टोक्स, युवराज सिंह (Photo Credits: Twitter)

IPL 2020: आघाडीवर सततच्या अपयशानंतर कोलकाता नाईट रायडर्सने (Kolkata Knight Riders) नुकत्याच संपुष्टात आलेल्या चेन्नई सुपर किंग्सविरुद्ध (Chennai Super Kings) मॅचमध्ये सुनील नारायणचे (Sunil Narine) डिमोशन करून त्याला चौथ्या स्थानावर फलंदाजीसाठी पाठवले. विंडीज खेळाडूऐवजी राहुल त्रिपाठीला केकेआरने (KKR) आजच्या साम्ण्यात सलामीला पाठवलं आणि राहुलनेही मिळालेल्या या संधीचं सोनं करत 51 चेंडूत 81 धावांची खेळी केली. नारायण चौथ्या स्थानावर 12व्या ओव्हरमध्ये फलंदाजीला आला आणि इयन मॉर्गन (Eoin Morgan),आंद्रे रसेल फलंदाजीस येणे अद्याप शिल्लक असताना चाहत्यांनी या निर्णयावर जोरदार टीका केली. राजस्थान रॉयल्सच्या बेन स्टोक्सनेही (Ben Stokes) केकेआरच्या रणनीतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि त्याला युवराज सिंहकडून (Yuvraj Singh) एक मजेदार उत्तर मिळाले. "इयन मॉर्गनच्या आधी सुनील नारायण???" स्टोक्स ट्विट केले. दरम्यान, स्टोक्स मागील आठवड्यात युएईमध्ये दाखल झाला असून सध्या तो 6 दिवसांचा क्वारंटाइन कालावधी पूर्ण करत आहे. (CSK vs KKR, IPL 2020: नाईट रायडर्सने हिरावला CSKच्या तोंडातला घास, 10 धावांनी मिळवला विजय; आयपीएल 13 मध्ये सुपर किंग्जचा चौथा पराभव)

युवराज लवकरच स्टोक्सच्या पोस्टवर नजर पडली आणि एका मजेदार प्रतिक्रिया देत नेटकऱ्यांचे लक्ष वेधले. “हो, हे स्टोक्सच्या आधी युवराजसारखे आहे! कधीकधी अष्टपैलू खेळाडूंना आधी पाठवावे लागते, गोलंदाज जे योग्य गोलंदाजासमोर फलंदाजी करु शकतात,” स्टोक्सच्या वक्तव्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना माजी किंग्ज इलेव्हन पंजाबच्या अष्टपैलू खेळाडूने कमेंट केले.

बेन स्टोक्सच्या वक्तव्यावर युवराजची प्रतिक्रिया!!

दरम्यान, चौथ्या क्रमांकावर बॅटिंगला आलेला नारायण आजच्या सामन्यात देखील प्रभावी फलंदाजी करू शकला नाही आणि 9 चेंडूत 17 धावा करुन आऊट झाला. यंदा आजवरच्या आयपीएलमध्ये नारायणची कामगिरी खराब झाली आहे. 5 सामन्यात त्याने फक्त 44 धावा केल्या आहेत. दुसरीकडे, आजच्या सामन्याबद्दल बोलायचे झाले तर चेन्नईच्या पराभवाची मालिका सुरूच राहिली. चांगली सुरुवात मिळूनही सीएसके विजयीरेषा पार करू शकली नाही. किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्ध 10 विकेटने विजय मिळवल्यानंतर आता कोलकात्याविरुद्ध सीएसकेला फक्त 10 धावांनी पराभव पत्करावा लागला आहे. सीएसकेचा यंदाच्या आयपीएलमधील हा चौथा पराभव ठरला.