चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स (Photo Credit: PTI)

CSK vs KKR, IPL 2020: इंडियन प्रीमिअर लीगच्या (Indian Premier League) 21व्या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सने )Kolkata Knight Riders) पहिले फलंदाजी करून दिलेल्या 168 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करत चेन्नई सुपर किंग्सला (Chennai Super Kings) 10 धावांनी पराभव पत्करावा लागला. केकेआरने (KKR) सीएसकेला दिलेले 168 धावांचे माफक लक्ष्य सीएसके (CSK) सहज गाठेल असे दिसत असताना गोलंदाजांनी नाईट रायडर्सच्या गोलंदाजांनी पुढाकार घेतला आणि चेन्नईच्या तोंडातुन घास हिरावला. आजच्या सामन्यातील विजयासह केकेआर विजयपथावर परतले आहे, तर सीएसकेचा यंदाच्या आयपीएलमधील हा चौथा पराभव ठरला. केकेआरचा हा आयपीएलमधील तिसरा विजय आहे.सीएसकेकडून सलामी फलंदाज शेन वॉट्सनने (Shane Watson) 50 धावा केल्या. अंबाती रायुडू 30, सॅम कुरनने 17, फाफ डु प्लेसिस आणि एमएस धोनी 11 धावांचे योगदान दिले. केकेआरकडून शिवम मावी, वरुण चक्रवर्ती, कमलेश नगरकोटी, सुनील नरेन आणि आंद्रे रसेल यांनी प्रत्येकी 1 विकेट घेली. (CSK vs KKR, IPL 2020: ड्वेन ब्रावोची वाढदिवशी विक्रमी कामगिरी, नाईट रायडर्सविरुद्ध 3 विकेट घेत झाला मलिंगा, पियुष चावला यांच्या एलिट यादीत सामील)

चेन्नई आणि कोलकाता यांच्यातील आजचा सामना अबू धाबी येथे खेळला गेला. चेन्नईकडून ड्यू प्लेसिस 10 चेंडूत 17 धावांवर बाद झाला. त्येनं शिवमच्या चेंडूवर विकेट गमावली. पॉवरप्लेमध्ये सुपर किंग्जने एका विकेट गमावून 54 धावा केल्या. सुपर किंग्जने 13 व्या षटकात रायुडूची विकेट गमावली. मात्र, वॉटसनने सलग दुसरे अर्धशतक झळकावले. वॉटसनने 39 चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले आणि पुढील चेंडूवर बाद झाला. धोनीला देखील आज केवळ 11 धावा करता आल्या. चेन्नईकडून केदार जाधव 7 आणि रवींद्र जडेजा 21 धावा करून नाबाद परतले. यापूर्वी, या सामन्यात कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार दिनेश कार्तिकने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता.

कोलकाताकडून राहुल त्रिपाठीशिवाय इतर कोणत्याही फलंदाजाने चांगली खेळी खेळली नाही. त्रिपाठीने सर्वाधिक 81 धावांची खेळी केली. कोलकाताकडून पॅट कमिन्स आणि सुनील नारायण यांनी प्रत्येकी 17 धावा केल्या. आजच्या सामन्यात केकेआरने नवीन सलामी जोडी मैदानात उतरवली. शुभमन गिल आणि राहुल यांनी संघाला वेगवान सुरुवात करून दिली. शिवाय नारायणला मधल्या फळीत फलंदाजीसाठी उतरवले. शबमन आणि राहुल यांनी चांगली सुरुवात करूनही कोलकाता 167 धावांवर ऑलआऊट झाली.