(Photo: Facebook)

आयपीएल (IPL) 2020 ची तयारी सुरू झाली आहे. पुढील वर्षी होणाऱ्या बहुप्रतीक्षित टी-20 लीगसाठी 19 डिसेंबरला कोलकाता (Kolkata) येथे लिलाव होणार आहे. यंदाच्या आयपीएलच्या लिलावासाठी बीसीसीआयने स्थान बदलले आहे. यापूर्वी आयपीएलसाठी खेळाडूंचा लिलाव बेंगळुरू येथे झाला होता. यावर्षीचा लिलाव मागील हंगामाइतका मोठा होणार नाही आणि त्यासाठीची ट्रेडिंग विंडो 14 नोव्हेंबरला बंद होईल. शिवाय, यंदा सर्व फ्रँचायझींना 85 कोटी रुपयांचे वाटप केले जाईल आणि त्यानुसार त्यांना स्वतःची टीम तयार करावी लागेल. पण, सर्व संघांकडे तीन कोटींचा अतिरिक्त पैसेही असेल. (IPL 2020: विराट कोहलीचा आवडता खेळाडू होणार किंग्ज इलेव्हन पंजाबचा कर्णधार, रविचंद्रन अश्विन याची होणार 'या' संघाबरोबर अदला-बदली)

सध्या लिलावात दिल्ली संघाकडे सर्वाधिक पैसे बाकी आहे. जर फ्रँचायझी निश्चित किंमतीपेक्षा कमी किंमतीत टीम बनवते तर उर्वरित पैसे फ्रँचायझीच्या खात्यात जमा होतात जे ते पुढील लिलावामध्ये खर्च करू शकते. त्यानुसार, सध्या दिल्लीला सध्याच्या लिलावात जमा असलेले पैसे देखील वापरता येणार आहे. दिल्ली कॅपिटल्स (Delhi Capitals) कडे 8.2 करोड आहे. तर, राजस्थान रॉयल्सकडे 7.15 कोटी, कोलकाता नाईट रायडर्स (Kolkata Knight Riders) 6.05 कोटी, सनरायझर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad) 5.3 कोटी, किंग्ज इलेव्हन पंजाब 3.7 कोटी, चेन्नई सुपर किंग्ज (Chennai Super Kings) 3.2 कोटी, मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) 3.5 कोटी आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु (Royal Challengers Bangalore) कडे 1.8 कोटीची थकबाकी आहे.

दरम्यान, यंदाच्या लिलावाधी अनेक मोठ्या आणि प्रसिद्ध खेळाडूंची एका संघातून दुसऱ्या संघात बदली केली जाऊ शकते. यात टीम इंडियाचा टेस्ट तज्ञ रविचंद्रन अश्विन याचादेखील समावेश आहे. पुढील वर्षी, 2020 मध्ये ऑस्ट्रेलियामध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकसाठी खेळाडूंची आयपीएलमधील कामगिरी निश्चितच लक्षात घेतली जाईल. 2019 मध्ये, विश्वचषकमुळे आयपीएल लवकर आयोजित करण्यात आले होते, पण पुढील वर्षी टी-20 विश्वचषक ऑक्टोबरमध्ये होणार असल्याने कोणीही समस्या नसल्याकारणाने आयपीएल नियोजित वेळी होईल.