IPL 2020 Auction Live Streaming: किती वाजता सुरु होणार लिलाव? पहा लाईव्ह स्ट्रीमिंग Star Sports नेटवर्कवर, जाणून घ्या किती खेळाडूंवर लागणार बोली
मुंबई इंडियन्स-चेन्नई  सुपर किंग्स (Photo Credit: PTI)

इंडियन प्रीमियर लीग (Indian Premier Leaguer) च्या पुढील आवृत्तीस अद्याप काही काळ शिल्लक आहे, परंतु त्याची चर्चा आधीपासूनच सुरू झाली आहे. प्री-सिझन द्राफ्ट गेल्या महिन्यात संपला, बर्‍याच खेळाडू एकतर फ्रँचायझीद्वारे सिलीज केले गेले किंवा त्याची अदला-बदलद्वार स्वाप केले गेले. आणि आता सर्वांचे लक्ष्य 19 डिसेंबरला होणाऱ्या लिलावाकडे असणार आहे. आयपीएल 2020 साठी खेळाडूंच्या लिलावासाठी आता फक्त एक आठवडा शिल्लक आहे. 19 डिसेंबरला कोलकातामध्ये खेळाडूंसाठी बोली लावली जाईल. कोलकातामध्ये आयपीएलचा (IPL) लिलाव होण्याची ही पहिलीच वेळ आहे. सध्या कोणत्या खेळाडूला विकत घेतले जाईल, कोण निराश होतील किंवा कोणाला सर्वात जास्त बोली याचा सध्या क्रिकेट तज्ञ आणि चाहते विचार करत आहेत. यापूर्वी आयपीएलच्या लिलावासाठी 971 खेळाडूंची यादी तयार करण्यात आली होती आणि आता या यादीत खाली खेळाडूंची नावे कमी करून नवीन यादी तयार करण्यात आली आहे. (IPL 2020 Auction: लिलावासाठी 332 खेळाडू शॉर्टलिस्ट, 2 कोटींच्या टॉप बेस प्राइसमध्ये एकही भारतीय नाही)

या लिलावासंदर्भातील सर्व माहिती आपणास येथे उपलब्द असेल. कोलकातामध्ये 19 डिसेंबरला लिलाव होत असून ही प्रक्रिया भारतीय वेळेनुसार दुपारी अडीच (2:30 PM) वाजता सुरू होणार असल्याचे समोर आले. लिलाव सुरू होण्याची सुरुवातीची वेळ सकाळी 10:00 वाजता होती परंतु अधिक प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी प्रसारक आणि मंडळाने लिलाव प्राइम-टाईम स्लॉटमध्ये ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. एका यूजरला प्रत्युत्तर देत डिजिटल ब्रॉडकास्टर स्टार स्पोर्ट्सने (Star Sports) याची पुष्टी केली. विव्हो आयपीएलचा लिलाव 19 डिसेंबरला स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी/1 एचडी हिंदी, स्टार स्पोर्ट्स फर्स्ट, 1 तामिळ, 1 तेलगू, 1 कन्नड चॅनेलवर उपलब्ध असेल.

दरम्यान, यंदाच्या लिलावात 332 खेळाडूंचा एकूण 73 जागांसाठी लिलाव होईल. या 73 पैकी 29 जागा परदेशी खेळाडूंसाठी आहे. यावर्षी चाहत्यांचे रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि किंग्ज इलेव्हन पंजाब लफ्रँचायसीकडे लक्ष लागून आहे. यावेळी रॉबिन उथप्पा याची बेस प्राइसभारतीय खेळाडूंमध्ये सर्वाधिक, दीड कोटींमध्ये आहे. वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट याची बेस प्राइस 1 कोटी आहे.