IPL 2020 Auction: लिलावासाठी 332 खेळाडू शॉर्टलिस्ट, 2 कोटींच्या टॉप बेस प्राइसमध्ये एकही भारतीय नाही
आयपीएल ट्रॉफी (Photo Credit: IANS)

आयपीएल (IPL) 2020 चा खेळाडूंचा लिलाव 19 डिसेंबर कोलकाता येथे होणार आहे. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या अहवालानुसार, लिलावासाठी 332 खेळाडूंची यादी करण्यात आली आहे. आयपीएल व्यवस्थापनाने 971 नोंदणीकृत खेळाडूंची यादी रद्द केली असून बुधवारी अंतिम खेळाडूंची यादी आठ फ्रँचायझींना पाठविली. यापूर्वी, लिलावासाठी एकूण 971 खेळाडूंनी नोंदणी केली होती. आता नवीन यादीनुसार 2 कोटींच्या पहिल्या बेस किंमतीवर दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू क्रिस मॉरिस (Chris Morris) याच्यासह ऑस्ट्रेलियाचा ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell), इंग्लंडचा विश्वचषक विजेता कर्णधार इयन मॉर्गन (Eoin Morgan) आणि पॅट कमिन्स (Pat Cummins) यांना स्थान देण्यात आले आहे. या बेस प्राईसमध्ये एकही भारतीय खेळाडू नाही आहे. रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) हा भारताचा अव्वल बेस प्राइस खेळाडू आहे. त्याला दीड कोटींच्या यादीत स्थान देण्यात आले आहे. 19 डिसेंबरला कोलकाता येथे होणाऱ्या लिलावात, खेळाडूंना त्यांच्या गुणवत्तेनुसार त्यांच्या बेस प्राइसवरुन बोली लावली जाईल. (IPL 2020 Auction: फॅनने आयपीएल लिलावाबद्दल विचारलेल्या 'या' प्रश्नावर जिमी नीशम याने दिली 'ही' प्रतिक्रिया, वाचून तुम्हीही सहमत व्हाल, पाहा Tweet)

गुरुवारी संध्याकाळपर्यंत खेळाडूंची संपूर्ण यादी आयपीएलच्या अधिकृत संकेतस्थळावर जाहीर केली जाऊ शकते. शॉर्टलिस्ट केलेल्या खेळाडूंमध्ये 24 नवीन खेळाडू म्हणजे अनकेप्ड खेळाडू आहेत. त्यांची नावे फ्रँचायजीनेच प्रस्तावित केली आहेत. मागील हंगामात 8.4 कोटीमध्ये विकल्या गेलेल्या वेगवान गोलंदाज जयदेव उनाडकट याचा 1 कोटीच्या बेस प्राइसमध्ये समावेश आहे. दरम्यान, लिलाव सकाळी 10 वाजता सुरू होणार आहे, तथापि, असे अनुमान आहेत की बोर्ड आणि ब्रॉडकास्टर सहमत असल्यास ते प्राइम टाइम स्लॉटवर ढकलले जाऊ शकते. तथापि, अद्याप याबाबत कोणतीही पुष्टी झालेली नाही.

लिलावात पहिले फलंदाज बोली लावतील. त्यानंतर अष्टपैलू खेळाडू, यष्टीरक्षक फलंदाज, वेगवान गोलंदाज आणि शेवटी फिरकीपटू असतील. यानंतर पहिले कॅप्ड आणि नंतर अनकॅप्ड खेळाडूंचा लिलाव होईल. एकूणच, 73 खेळाडू रिक्त आहेत. यापैकी 29 जागा परदेशी खेळाडूंसाठी आहेत.