ईडन गार्डन्सवर (Eden Gardens) 22 ते 26 नोव्हेंबर दरम्यान भारत आणि बांग्लादेश (India vs Bangladesh) यांच्यात दुसरा कसोटी सामना खेळला जाणार आहे. महत्वाचे म्हणजे हा सामना डे-नाईट (Day-Night Test) असल्याची माहिती बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली (Sourav Ganguly) यांनी दिली. पहिल्यांदाच भारतामध्ये अशा प्रकारचा डे-नाईट सामना पार पडणार आहे त्यामुळे याबद्दल सर्वांनाच उत्सुकता आहे. दोन्ही देशांसाठी ही पहिली डे-नाईट टेस्ट असेल, तर डे-नाईट टेस्ट आयोजित करणारे ईडन गार्डन्स हे देशातील पहिले स्टेडियम असेल. 2015 मध्ये ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात अॅडलेड ओव्हल येथे पहिली डे-नाईट टेस्ट खेळली गेली होती.
View this post on Instagram
Eden Gardens set to host India's first ever Day-Night Test Check our story for full Deets 🗞️🗞️ 👆🏻
याबाबत सौरव गांगुली यांनी बीसीबीच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला. कसोटी क्रिकेटला पुढे नेण्याची ही एक उत्तम संधी असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. भारताच्या या पहिल्या डे-नाईट सामन्यादरम्यान ऑलिम्पिक खेळाडू अभिनव बिंद्रा, एमसी मेरी कॉम आणि पीव्ही सिंधू यांचा सन्मान करण्याची योजना आहे. भारत आणि बांगलादेश यांच्यात दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेचा पहिला सामना 16 नोव्हेंबरपासून रोजी इंदूर येथे होईल. तर दुसरा सामना 22 नोव्हेंबरपासून कोलकाता येथे खेळला जाईल. कसोटी मालिकेपूर्वी दोन्ही संघांमध्ये तीन T -20 मालिका खेळल्या जातील. पहिला सामना 3 नोव्हेंबरला होणार आहे. (हेही वाचा: IND vs BAN 2019: खराब हवा असूनही दिल्लीमध्येच होणार भारत-बांग्लादेश संघातील पहिला टी-20 सामना, BCCI ने दिले स्पष्टीकरण)
दरम्यान, दक्षिण आफ्रिकेसमवेत रांची येथे खेळलेला तिसरा कसोटी सामना संपल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार कोहलीने प्रेक्षकांच्या कमी संख्येवर नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे दिवस-रात्र कसोटी क्रिकेटला अधिकाधिक प्रेक्षक मिळतील असे गांगुली यांचे मत आहे. या सामन्यासाठी सर्वात कमी म्हणजे 50, 100, 150 असा तिकिटांचा दर असणार आहे. ईडन गार्डन्सवर अशाप्रकारचे सामने दरवर्षी खेळवले जाणार आहेत.