IND vs BAN 2019: खराब हवा असूनही दिल्लीमध्येच होणार भारत-बांग्लादेश संघातील पहिला टी-20 सामना, BCCI ने दिले स्पष्टीकरण
(Photo Credit: wikimedia)

भारत (India) आणि बांगलादेश (Bangladesh) यांच्यातील 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेतिल पहिला सामना 3 नोव्हेंबरला दिल्लीच्या अरुण जेटली स्टेडियम (Arun Jaitley Stadium) मध्ये खेळवला जाणार आहे. अरुण जेटली स्टेडियमवर होणारा हा सामना नियोजित वेळापत्रकानुसार होईल, असे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) स्पष्टीकरण दिले आहे. आणि याचे कारण म्हणजे, दिवाळीच्या वेळी शहरातील प्रदूषण भयानक पातळीवर पोहोचल्यावर या सामन्यास भीती निर्माण झाली होती. दिल्लीतील वायू प्रदूषणाची पातळी अत्यंत खराब असूनही सामना खेळला जाईल, असे बीसीसीआयने म्हटले आहे. एअर क्वालिटी इंडेक्सनुसार (Air Quality Index) 0-50 दरम्यान हवेची गुणवत्ता चांगली मानली जाते.गुरुवारी मिळालेल्या माहितीनुसार, दिल्ली विद्यापीठातअत्यंत निकृष्ट दर्जा, अशी हवेची गुणवत्ता नोंदविली गेली आहे. विशेष म्हणजे 2017 मध्येही श्रीलंका क्रिकेट संघाच्या खेळाडूंनी प्रदूषणामुळे कसोटी सामन्यादरम्यान क्षेत्ररक्षण करण्यास नकार दिला होता. त्यावेळीदेखील, दिल्लीत प्रदूषणाची पातळी खूपच जास्त खालावली होती आणि बरेच श्रीलंकेचे खेळाडू मुखवटे घालून मैदानावर उतरले होते. (IND vs BAN T20I 2019: बांग्लादेशविरुद्ध टी-20 मालिकेत 'हे' 3 फलंदाज घेऊ शकतात टीम इंडियामध्ये विराट कोहली याची जागा)

बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की, "आम्ही सामन्यासाठी दिल्ली प्रदूषण नियंत्रण समितीकडून (डीपीसीसी) परवानगी घेतली आहे आणि त्यांनी 3 नोव्हेंबरचा दिवस स्पष्ट दिवस म्हणून सांगितला आहे, म्हणूनच आम्ही सल्ल्यानुसार सामन्याचे ठिकाण न बदलण्याचे निश्चित केले आहे." जर परिस्थिती बिकट झाली तर काय होईल असे विचारले असता बीसीसीआयच्या सूत्रांनी म्हटले की, “आता सर्व काही ठरले आहे, आता या योजनेत काही बदल होईल असे मला वाटत नाही.”

बांगलादेशला प्रथम नोव्हेंबरमध्ये भारताविरुद्ध टी-20 मालिका खेळायची आहे, ती अनुक्रमे 3,7 आणि 10 नोव्हेंबरला दिल्ली, राजकोट आणि नागपूरमध्ये खेळवला जाणार आहे. यांच्यानंतर दोन्ही संघात दोन टेस्ट मालिकेतील सामना 14 नोव्हेंबरला इंदोरला आणि 22 नोव्हेंबरला कोलकाताच्या ईडन गार्डन्समध्ये खेळला जाईल.