IND vs ENG 3rd Test: इंग्लंडविरुद्ध सुरू असलेल्या कसोटी मालिकेतील तिसऱ्या सामन्यात टीम इंडियाने प्रतिस्पर्ध्याला 5 धावांची भेट दिली आहे. सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर झालेल्या सामन्याच्या दुसऱ्या दिवशी घाईघाईत धाव घेण्याचा प्रयत्न करण्यापूर्वी टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू रविचंद्रन अश्विनने (R Ashwin) केलेल्या चुकीसाठी ॲनफिल्ड अंपायर जोएल विल्सन यांनी भारतीय संघाला 5 धावांचा दंड ठोठावला (5 Penalty runs for England) आहे. परिणामी, इंग्लंड संघाने पहिल्या डावात 5/0 धावांनी डावाला सुरुवात केली. डावातील 102 व्या षटकातील चौथ्या चेंडूवर ही घटना घडली. इंग्लंडचा युवा लेग-स्पिनर रेहान अहमदच्या समोर चेंडू कव्हर्सच्या दिशेने मारणारा आर अश्विन, झटपट धाव घेण्यास उत्सुक होता आणि क्षेत्ररक्षक जवळ असल्याचे लक्षात आल्यावर तो क्रीजवर परतला. या घाईत अश्विनने खेळपट्टीच्या मध्यभागी धाव घेत नियम मोडले.
पंचांनी दिली होती ताकीद
सहसा ही चूक फलंदाजाने डावात प्रथमच केली असेल तरच अंपायर चेतावणी देतात. मात्र, एकाच प्रकारची चूक दोनदा झाल्यास विरोधी संघासाठी 5 धावा घोषित केल्या जातील. राजकोट कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी असेच घडले. सामन्याच्या पहिल्या दिवशी अष्टपैलू रवींद्र जडेजाने ही चूक केली आणि त्याला पंचांनी ताकीद दिली. दुसऱ्या दिवशी अश्विनने तीच चूक केल्याने भारतीय संघाला 5 धावांच्या पेनल्टीला सामोरे जावे लागले. (हे देखील वाचा: NZ Beat SA, 2nd Test: दुसऱ्या कसोटीत न्यूझीलंडने दक्षिण आफ्रिकेचा 7 विकेट्सने केला पराभव, मालिका 2-0 ने घातली खिशात)
India incurs a 5-run penalty for running on the pitch, giving England a head start with 5/0 on the scoreboard before they even begin their innings.#IndvEngTest #RavindraJadeja #TestCricket #Icc pic.twitter.com/02UIrcXeun
— Cricadium CRICKET (@Cricadium) February 16, 2024
पेनल्टी रनबद्दल काय सांगतो नियम ?
आता जर आपण यावर MCC च्या संपूर्ण नियमांबद्दल बोललो तर कायदा 41.14.1 नुसार, खेळपट्टीच्या मध्यभागी धावणे हे प्रकरण 'अनफेअर प्ले' च्या कलमाखाली येते. नियमात असे म्हटले आहे की, 'खेळपट्टीचे जाणूनबुजून किंवा कोणत्याही परिस्थितीत नुकसान करण्याची प्रक्रिया अयोग्य मानली जाते. खेळताना स्ट्रायकर संरक्षित भागात गेला तर त्याला तेथून लगेच निघावे लागते. धोक्याच्या ठिकाणी फलंदाजाची उपस्थिती विनाकारण आहे आणि त्यामुळे नुकसान होऊ शकते असे पंचांना वाटत असेल तर पंच इशारा देतात.
अश्विनने पंचांशी वाद घातला
आर अश्विन, धाव घेण्यासाठी खेळपट्टीच्या मध्यभागी धावला, त्याने मैदानावरील पंच जोएल विल्सन यांच्याशी वाद घातला आणि त्याच्या नकळत ही चूक असल्याचे त्याला पटवून देण्याचा प्रयत्न केला. मात्र, ही पहिलीच वेळ नसून दुसरी चूक असल्याचे सांगत जोएलने लगेचच 5 धावांची पेनल्टी जाहीर केली. अश्विनच्या युक्तिवादाला काही किंमत मिळाली नाही. या मधल्या व्हिडीओमध्ये भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा पेनल्टीवर नाराज असल्याचे दिसून आले.