Team India (Photo Credit - Twitter)

IND vs SL 1st T20: टीम इंडिया (Team India) थोड्या विश्रांतीनंतर 2023 मध्ये आपल्या व्यस्त क्रिकेट वेळापत्रकात परतणार आहे. बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतील विजयानंतर भारतीय खेळाडूंना छोटा ब्रेक मिळाला होता, मात्र आता 3 जानेवारी 2023 पासून खेळाडूंचे व्यस्त वेळापत्रक पुन्हा एकदा श्रीलंका मालिकेपासून (IND vs SL) सुरू होणार आहे. नवीन वर्षात मोठ्या बदलांसह, भारतीय क्रिकेट संघ 3 जानेवारी 2023 पासून म्हणजे आजपासुन श्रीलंकेविरुद्ध 3 सामन्यांच्या टी-20 मालिकेने सुरुवात करणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली, केएल राहुलसारख्या वरिष्ठ खेळाडूंशिवाय, हार्दिक पंड्याच्या नेतृत्वाखाली युवा खेळाडूंसह टी-20 मालिकेत भारत श्रीलंकेचा सामना करेल. तसेच हा सामना तुम्ही कधी आणि कुठे पाहू शकतात या बद्दल जाणून घ्या...( हे देखील वाचा: IND vs SL 1st T20: पहिल्या टी-20 मध्ये कर्णधार हार्दिक पांड्या घेणार मोठा निर्णय, 'या' मोठ्या खेळाडूला ठेवणार बाहेर)

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-20 सामना कधी आणि कुठे खेळवला जाणार आहे?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील पहिला टी-20 सामना 3 जानेवारीला म्हणजे आज होणार आहे आणि हा सामना मुंबईतील वानखेडे मैदानावर खेळवला जाणार आहे.

पहिला टी-20 सामना किती वाजत खेळवला जाणार आहे?

भारत विरुद्ध श्रीलंका पहिला टी-20 सामना भारतीय वेळेनुसार संध्याकाळी 7 वाजता खेळवला जाणार आहे तसेच 6.30 वाजता नाणेफेक होईल.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेचे थेट प्रक्षेपण तुम्ही कोणत्या चॅनलवर पाहू शकता?

तुम्ही स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेचे थेट प्रक्षेपण पाहू शकता. तुम्ही स्टार स्पोर्ट्स 1, स्टार स्पोर्ट्स 1 एचडी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी, स्टार स्पोर्ट्स 1 हिंदी एचडी, स्टार स्पोर्ट्स फर्स्ट, स्टार स्पोर्ट्स 1 तमिळ, स्टार स्पोर्ट्स 1 तेलुगु, स्टार स्पोर्ट्स 1 कन्नड वर भारत विरुद्ध श्रीलंका हा सामना पाहू शकतात

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेचे लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही कुठे पाहू शकतात?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेचे लाइव्ह स्ट्रीमिंग तुम्ही Disney+Hotstar अॅप आणि वेबसाइटवर पाहता येईल.

भारत आणि श्रीलंका यांच्यातील टी-20 मालिकेचे थेट प्रक्षेपण तुम्ही विनामूल्य कुठे पाहू शकता?

डीडी फ्री डिश प्लॅटफॉर्मद्वारे डीडी स्पोर्ट्सवर भारत आणि श्रीलंका (IND vs SL) यांच्यातील T20 मालिकेचे थेट प्रक्षेपण तुम्ही विनामूल्य पाहू शकता.