Team India Squad Announced for Champions Trophy 2025: चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडियाची (Team India) घोषणा करण्यात आली आहे. बीसीसीआयचे मुख्य निवडकर्ता अजित आगरकर आणि भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा यांनी शनिवारी मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात पत्रकार परिषद घेवुन संघ जाहीर केला आहे. या पत्रकार परिषदेत चॅम्पियन्स ट्रॉफीसह इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी संघाची घोषणा केली आहे. चॅम्पियन्स ट्रॉफी 19 फेब्रुवारीपासून सुरू होईल, तर इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका 6 फेब्रुवारीपासून सुरू होईल. हे देखील वाचा: Virat Kohli आणि KL Rahul रणजी सामना खेळणार नाहीत, मोठे कारण आले समोर
चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 साठी टीम इंडियाचा संघ जाहीर
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जयस्वाल, शुभमन गिल (उपकर्णधार), विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), ऋषभ पंत (यष्टीरक्षक), हार्दिक पांड्या, अक्षर पटेल, वॉशिंग्टन सुंदर, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह (हर्षित राणा एकदिवसीय मालिका खेळेल), मोहम्मद शमी, अर्शदीप सिंग
India have named their squad for the Champions Trophy pic.twitter.com/U78Qt0iZYn
— ESPNcricinfo (@ESPNcricinfo) January 18, 2025
चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी टीम इंडियाचे वेळापत्रक
20 फेब्रुवारी 2025: भारत विरुद्ध बांगलादेश
स्थळ: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
23 फेब्रुवारी 2025: भारत विरुद्ध पाकिस्तान
स्थळ: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई
2 मार्च 2025: भारत विरुद्ध न्यूझीलंड
स्थळ: दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, दुबई